सुशील ओझा,झरी: मुकुटबन-खडकी मार्गावर मागे अपघातात अडेगावच्या युवकाचा मृत्यू झाला. धडक देऊन पसार झालेल्या दुचाकी स्वाराचा शोध घेणे मुकूटबन पोलिसांसमोर आवाहन होते. परंतु पोलिसांनी शोध घेऊन दोन दिवसातच आरोपी याला अटक करून दुचाकी जप्त केली. आरोपी अजित कुमार सिंग (32) रा. गुडगाव हरियाणा, हल्ली मुक्काम वणी याला अटक केली. तर दुचाकी पॅशन प्रो (MH 29 BK 8755) जप्त करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की अडेगाव येथील प्रशांत मारोती ढेंगळे (28) हा दिनांक 17 ऑक्टोबर रोजी आपल्या मित्रांसोबत मुकुटबन येथे कामानिमित्त आला होता. काम संपवून घरी जाण्यास निघाला. वाटेत मुकुटबन जवळील इसार पेट्रोल पंप येथे तो दुचाकीत पेट्रोल टाकण्याकरिता गेला. पेट्रोल टाकून गावाकडे वळण घेताना मुकुटबनकडूनच येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ढेंगळे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडकेत प्रशांत ढेंगळे हा गंभीर जखमी झाला. तर त्याचा मित्र संदीप किन्हेकरला किरकोळ मार लागला. दरम्यान धडक मारणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरून लगेच पसार झाला.
जखमी प्रशांतला प्रथम मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात आणले. व प्रकृती सिरीयस असल्याने त्याला वणी रेफर केले. परंतु त्याचा वाटेतच मृत्यू झाला. यावरून संदीप किनेकर याने ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 279,337,304 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल केले.
ही कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार,मोहन कुडमेथे व जितेश पानघाटे करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)