सुशील ओझा,झरी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात मग्ररोहयोच्या संदर्भात विशेष आढावा बैठकीचे आयोजन २० ऑक्टोबरला करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय (म.ग्रा.रो.ह.यो.) विभाग यवतमाळ यांच्याकडून आढावासभा घेण्यात आली.
ह्या सभेला उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून नायब तहसिलदार खाटीक, जिल्हा MIS समन्वयक शेखर विरुटकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शरद राठोड, पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार, तहसिलदार गिरीश जोशी, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांसह विविध विषयांवर पंचायत समिती सभागृहात आढावासभा झाली.
ह्या आढावासभेमध्ये तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 5 तरी कामे त्वरीत सुरु करावीत, असे आदेश देण्यात आलेत. ह्या आढावासभेत सर्व ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच, प्रशासक, वन अधिकारी, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणेचे प्रतिनिधी तसेच सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)