स्वरसाज म्युझिक अकादमीचे थाटात उद्घाटन
तबला, गायन, गिटार, किबोर्ड, ऑक्टोपॅड इ. साठी प्रवेश सुरू
विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध संगीत ऑर्केस्ट्रा स्वरसाज एन्टरटेंमेंटच्या म्युझिक अकादमीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाळ सरपटवार यांच्या घरी ही म्युझिक अकादमी सुरू करण्यात आली आहे. या अकादमीत तबला, हार्मोनियम, गायन, गिटार, किबोर्ड, ऑक्टोपॅडसोबतच कथ्थकचे शिक्षण देखील दिले जाणार आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
उद्घाटनाला जैताई देवस्थानचे सचिव माधवराव सरपटवार, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के, नायब तहसीलदार व परिसरातील नामवंत गायक विवेक पांडे, ज्येष्ठ पत्रकार संतोष कुंडकर, कविता चटकी यांच्यासह कलाक्षेत्र व रसिकांची उपस्थिती होती.
स्वरसाज अकादमीत तबला, ढोलक, ढोलकी, गायन, हार्मोनियम, कीबोर्ड, गिटार, कथ्थक इत्यादीचे क्लास घेतले जाणार आहे. स्थानिक तसेच बाहेरगावातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. अकादमीतील विद्यार्थ्यांना संगीत विद्यापीठाच्या परीक्षेला बसण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
वेस्टर्न आणि क्लासिकल संगीत पद्धती उपलब्ध: अभिलाष राजूरकर
वणीची कला आणि संगीत क्षेत्रात एक वेगळी ओळखी होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही ओळख पुसणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिसरात विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे यासाठी स्वरसाज अकादमी प्रयत्नशील राहणार आहे. यासोबतच आज वेस्टर्न संगीत हे तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध वेस्टर्न क्लासिकल संगीताचे शिक्षण मिळावे यासाठी वेस्टर्न पद्धतीचे अभ्यासक्रम देखील विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी बाहेरगावाहून तज्ज्ञ येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
– अभिलाष राजूरकर, संचालक स्वरसाज अकादमी
केवळ संगीत शिकण्यापुरतेच शिकू नये तर विद्यार्थ्यांनी एक उत्तम परफॉर्मिंग आर्टिस्ट देखील बनावे यासाठीही स्वरसाज अकादमी प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांना स्टेज परफॉर्मन्स व लाईव्ह परफॉर्मन्ससाठीही तयार केले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन स्वरसाज अकादमीतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: अभिलाष राजूरकर – 95453 57788
किंवा येथे क्लिक करून व्हॉट्स ऍपवर संपर्क साधा…