जितेंद्र कोठारी, वणी: पाणीपट्टी कराच्या स्वरूपात वसूल केलेल्या रक्कमेतुन तब्बल 17 लाख 34 हजार रुपयांची परस्पर अफरातफर करणाऱ्या वणी न.प. च्या कंत्राटी कारकूनवर अखेर मंगळवारी रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. नगर परिषद जलापूर्ती अभियंता शुभम तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कंत्राटी कर्मचारी अंकित कोयचाडे विरुद्द कलम 409 अनव्ये गुन्हा दाखल केले.
माहितीनुसार नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी पदासह अभियंता व कर्मचाऱ्यांचे अनेक पदं रिक्त आहेत. तर जलापूर्ती विभागाचे अभियंता व कर्मचारी रजेवर आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे नगर परिषदचे बहुतांश कार्य कंत्राटी व खाजगी व्यक्तींमार्फत केले जाते. जलापूर्ती विभाग अंतर्गत पाणीपट्टी वसुलीचे कार्य कंत्राटी संगणक ऑपरेटर अंकित कोयचाडे याला देण्यात आले.
अंकित कोयचाडे यांनी 1एप्रिल 2019 ते 1 ऑक्टो. 2020 पर्यंत नगर परिषद सीमेतील नळधारकांकडून 71 लाख 33 हजार 110 रु. पाणीपट्टी कर वसूल केले. मात्र या कालावधीत वसूल केलेल्या शासकीय रक्कमेतून त्यांनी तब्बल 17 लाख 34 हजार 758 रु. नगर परिषद कोषागारमध्ये जमा न करता परस्पर अपाहार केले.
पाणीकर वसुलीच्या हिशोबात गडबड होत असल्याची कुणकुण लागतच नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले. मुख्याधिकारी महेश रामगुंडे यांनी चार सदस्यीय चौकशी समितीचे नेमून प्रकरणाची सखोल चौकशी केली.
समितीने दि. 28 ऑक्टो.2020 रोजी आपले अहवाल सादर केले. अहवालानुसार कंत्राटी कर्मचारी अंकित कोयचाडे यांनी आय. डी. व सर्व साधारण पावती यांची एकूण वसुली 71,33,710 रु .पैकी 53,98,342 रु. नगर परिषद मध्ये भरणा केले. तर उर्वरित 17,34,758 रुपयांचे हिशोब दिले नाही.
नगर परिषद जलापूर्ती अभियंता शुभम तायडे यांनी संबंधित कर्मचारी अंकित कोयचाडे यास नोटीस देऊन समक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्या अनुषंगाने अंकित कोयचाडे यांनी चौकशी समिती समक्ष हजर होऊन गहाळ केलेली रक्कम भरण्याचे लेखी हमीपत्र दिले. मात्र 2 नोव्हें. पर्यंत कर्मचाऱ्यांनी पाणी कर वसुलीची रक्कम भरणा केली नाही.
अखेर नगर परिषद तर्फे जलापूर्ती अभियंता शुभम तायडे यांनी दि. 3 नोव्हें. रोजी सायंकाळी वणी पोलीस मध्ये कंत्राटी कर्मचारी अंकित रामचंद्र कोयचाडे विरुद्द शासकीय रक्कमेचा अपाहर केल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी अंकित रामचंद्र कोयचाडे (वय 25), रा. वणी विरुद्द भा.द.वि. कलम 409 अनव्ये गुन्हा दाखल केले असून आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे.
अग्रीम जामिनासाठी आरोपीची कोर्टात धाव
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच आरोपी अंकित कोयचाडे यांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पांढरकवडा सत्र न्यायालयात अग्रीम जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. पुढील चौकशी ठाणेदार वैभव जाधव करीत आहे
चौकशी समितीच्या अहवालामध्ये आरोपी कर्मचारी यांनी शासकीय रक्कमेचा अपाहर केल्याचे स्पष्ट झाले आहे. गहाळ केलेली रक्कम भरणा करण्यासाठी आम्ही सदर कर्मचाऱ्यांस मुदत दिली. मात्र त्यांनी रक्कमेचा भरणा न केल्यामुळे मंगळवारी कर्मचारी अंकित कोयचाडे विरुद्द वणी.पो.स्टे.ला तक्रार देण्यात आली.
पाणी कर वसुलीच्या अपहार प्रकरणी इतर कोणी दोषी आढळल्यास त्यांचे विरुद्दही कठोर कार्यवाही केली जाईल.
महेश रामगुंडे : प्रभारी मुख्याधिकारी, न.प. वणी
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)