गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कृष्णानपूर येथील शेतकऱ्याचा पिकावर फवारणी करताना विष बाधा उपचार दरम्यान झाला मृत्यू झाला. त्यांच्यावर सुगम हॉस्पिटलमध्ये गेल्या 5 दिवसांपासून उपचार सुरू होता.
कृष्णानपूर येथील शेतकरी जंगलु महादेव ठावरी (48) यांना शेतात पिकावर फवारणी करत असताना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. तेव्हाच त्यांना वणी येथील सुगम हॉस्पिटल येथे आणन्यात आले. मात्र 5 दिवस उपचार केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
सतच बदलत असेलेल्या वातावरणामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे फवारणीचं प्रमाणही अधिक आहे. त्याचा परिमाण हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठताना दिसत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेले रासायनिक औषधी बोगस असल्याने त्याला शेतकरी मोठ्या प्रमाणात बळी असल्याचा आरोप होत आहे.