आदिवासी हृदयसम्राट बापूरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी
झरी तालुक्यातल्या विविध आदिवासी संघटनांनी केले अभिवादन
सुशील ओझा,झरी: तालुक्यात आदिवासी सामाजिक संघटनांच्यावतीने आदिवासी हृदयसम्राट बाबुरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी झाली. यानिमित्त त्यांच्या तैलचित्रांचे पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर वाजतगाजत रॅली निघाली. क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या तैलचित्राला मानवंदना वाहण्यात आली. नंतर बस स्टॉप चौक येथे क्रांतिसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे पूजन आणि माल्यार्पण करून रॉलीची सांगता करण्यात आली.
यावेळी दयाकर गेडाम यांनी विचार मांडलेत. तालुक्यातील आदिवासींनी एकजुटीने सामाजिक कार्य करावे. समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी, आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाविरोधात धाऊन जाण्याची गरज आहे. एकतेची मशाल पेटवत ठेवण्याची आजच्या काळाची गरज आहे. असं ते यावेळी बोलताना म्हणालेत.
यावेळी दयाकर गेडाम, नामदेव किनाके, मनोहर गेडाम, विकास कुळमथे, तुकाराम आत्राम, आत्माराम आत्राम, बंडू आडे आणि आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
हेदेखील वाचा
आज कोरोनाचे 7 रुग्ण, शहरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ
हेदेखील वाचा