जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मागासवर्गीय उमेदवारांना 'या' साईटवर करावे लागेल डॉक्युमेंट अपलोड

0

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायतीमधील मागास प्रवगासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना www.bartievalidity.maharshtra.gov.in या वेब पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.

सदर पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती व आवश्यक ते कागदपत्र अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करायचे आहे. त्यानंतर त्यांची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहीत कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी यांचेमार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावे लागणार आहे

दरम्यान जुन्या पध्दतीने हस्तलिखीत स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे वेब पोर्टलवर जाऊनच जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी केले आहे.

राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हातील 980 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

हे पण वाचा:

प्रतिबंधित औषधी विकणे पडले महागात, दोघांवर गुन्हा दाखल

हे पण वाचा:

तालुक्यात कोरोनाचा हाहाकार, आज तब्बल 18 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.