सुशील ओझा, झरी: 15 डिसेंबर 2015च्या नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनसागर एकत्रित आला होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात परधान समाज एकता दिवस दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होतो. त्यानिमित्त सभेचे आयोजन, सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रबोधन असे अनेक उपक्रम समाजबांधवांकडून आयोजित केले जातात.
झरी तालुक्यात अनिल पोयाम यांच्या घरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बरेच परधान बांधव मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील असलेल्या कलाकारांना प्रोत्साहन म्हणून कला, संस्कृतीमध्ये योगदान देणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
कारेगाव येथील नीळकंठ उईके यांना कला संस्कृतीमध्ये आदिवासी गिरिजन पुरस्कार (म.राज्य) प्राप्त आहे. तसेच मांगलीचे गायक रवी बोरकर या दोघांचाही पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.
तसेच परधान समाज संघटना अध्यक्ष व कार्यकारिणीमार्फत झरी शाखेच्या नवनियुक्त सभासदाची यावेळी निवड करण्यात आली. त्यात प्रशांत येटे (अध्यक्ष), गणेश सोयाम(सचिव), पुरुषोत्तम पंधरे (सहसचिव), पवन नैताम(कोषाध्यक्ष), माधव कोडापे, दत्ता परचाके ही कार्यकारिणी ‘नवीन झरी परधान समाज संघटना स्थापन’ करण्यात आली.
या बैठकीला दयाकर गेडाम, (परधान समाज संघटना अध्यक्ष) उपस्थित होतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर गेडाम, सूत्रसंचालन मदन गेडाम यांनी केले. तसेच तालुक्यातील परधान समाज पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक, समाजबांधव मोठ्या संख्येने आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा