राजूर येथील मुख्य रस्त्यावरील पथदिवे 2 महिन्यांपासून बंद
निवेदन घेऊन गेलेल्या महिलांना अभियंत्यांनी ताटकळत ठेवले
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील मुख्य रस्त्यावरील निम्याहून अधिक पथदिवे मागील 2 महिन्यापासून बंद आहेत. पथदिवे पूर्ववत सुरू करण्याकरिता येथील नागरिकांनी अनेकदा वेकोलि अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
मात्र दरवेळी यांत्रिक अधिकारी वेळ मारून नेत असल्यामुळे राजूर (कॉ.) येथील महिला 20 डिसेंबरला पुन्हा एकदा निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी वेकोलीच्या वरिष्ठ प्रबंधक, (विद्युत व यांत्रिक) वणी नॉर्थ कार्यालयात धडकल्यात. परंतु अधिकाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना तब्बल 2 तास ताटकळत ठेवले. अखेर डिस्पेच विभागामध्ये निवेदन देऊन महिला परतल्या.
राजूर (कॉ.) व राजूर (इजारा) गाव वणी-यवतमाळ मार्गावरून उत्तरेस 2 किमी आत आहे. राजूर येथून शेकडो नागरिक, विद्यार्थी, कामगार कामानिमित्त दररोज वणी, मारेगाव येथे ये-जा करतात. तर वेकोलिमध्ये काम करणारे अनेक कर्मचारीही प्रतिदिन बाहेरगावावरून येऊन सायंकाळी परत आपल्या गावी जातात. पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय संपूर्ण रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे महिलांची सुरक्षाही धोक्यात आली.
येत्या 10 दिवसांत वेकोलिने बंद असलेले पथदिवे सुरू न केल्यास राजूर (कॉ.) येथील महिला वेकोलि प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करणार. असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देताना राजूर (कॉ.) येथील समय्या कोंकटवार, आशा रामटेके, दुर्गा एलगुलवार, अश्विनी एलगुलवार, व्यंकटी मुक्का,
श्रीजोत, विनोद तानरा,अब्राहम कलवलवार, वर्षा धुर्वे, माहेश्वरी गिरडवार, अश्विनी, विजया एलगुलवार, सिनू गड्डमवार, सुरेश अन्ना, विनोद आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत खासदार सुरेशभाऊ धानोरकर व पालकमंत्री संजय राठोड यांना पाठविण्यात आली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा