अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा

आठवडी बाजार करून परत असताना झाला होता अपघात

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथील 2 तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या दुचाकीने बैलगाडीला जबर धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रात्री उपचारासाठी वणी येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

28 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान अर्धवन येथील नितेश चांदेकर (28) हा गावातीलच यशपाल झोडे (16 याला घेऊन मुकुटबन येथे बॅंकच्या कामाकरिता तसेच आठवडी बाजार असल्याने भाजीपाला घेण्याकरीता स्प्लेंडर या दुचाकीने (एमएच 29 के 8196) आले होते.

बँकेचे काम व भाजीपाला घेऊन घरी परत जात असताना दोस्ताना धाब्याजवळ त्यांच्या दुचाकीने एका बैलगाडीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात ते दोघेही रोडच्या खाली पडले. अपघातात नितेश याच्या डोक्याला जबर मार लागला. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात सुरू झाला तर यशपाल याला गुप्त मार लागला होता.

अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच नीरज पातुरकर, प्रदीप कवरासे होमगार्ड प्रज्योत ताडूरवार हे घटनास्थळी पोहचून दोघांनाही मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात आणले. जखमींना बघण्याकरिता दवाखान्यात मुकुटबन व अर्धवन येथी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड जमादार अशोक नैताम, रंजना सोयाम, सुलभ उईके, प्रवीण ताडकोकुलवार व चालक विजय मोगरे हे दवाखान्यात पोहचले.

दोन्ही तरुणांना रुग्णवाहिकेमध्ये टाकून वणी येथे रवाना केले. वणी येथील दवाखान्यात दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. नितेश यांच्या मागे आई वडील, पत्नी, बहीण व एक मुलगा आहे. दोघांच्या अपघातात मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

हे देखील वाचा:

रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ

हे देखील वाचा:

3 जानेवारीला ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन

Leave A Reply

Your email address will not be published.