जब्बार चीनी, वणी: क्रिकेट सट्टा प्रकरणी व मटका जुगार प्रकरणी आरोपींना दिलासा मिळालेला नाही. शनिवारी वणी कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला. दोन्ही प्रकरणी न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची शनिवारी सुनावणी होती. मात्र न्यायालयांने दोन्ही प्रकरणी आरोपींचा जामीन नाकारला. वणीच्या कोर्टातून दिलासा न मिळाल्याने आता आरोपींना पांढरकवडा येथील सेशन कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.
10 जानेवारी रोजी वरोरा रोड येथील आमेर बिल्डर येथे पोलिसांनी ऑनलाईन सट्टा प्रकरणी धाड टाकली होती. यात शहरातील सुपरिचित बिल्डर जम्मू उर्फ जमीर खान याच्यासह रियाज सत्तार शेख, एजाज अली ताहीर अली मो. सहफ मो. शब्बीर चीनी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे साडे सहा लाखांचा मुद्देमालही जप्त केला होता. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी आरोपींना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली.
मटका अड्डा धाड प्रकरणीही न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दोन्ही प्रकरणी आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. शनिवारी सरकारी आणि आरोपींच्या वकीलांकडून जोरदार युक्तीवाद झाला. अखेर दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने आरोपींचा जामीन नाकारला. कोर्ट जामिनावर काय निर्णय़ देते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यामुळे कोर्ट परिसरात एकच गर्दी झाली होती.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: