उद्या वणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयंत पाटील यांची उपस्थिती

0

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दिनांक 29 जानेवारी रोजी वणी येथील शेतकरी मंदिरात दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आगामी नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात येत आहे.

Podar School 2025

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, रा. काँ. युवक अध्यक्ष मेहबुब शेख, रा. काँ. युवती अध्यक्ष मनाली बेलारे, विद्यार्थी परिषद अध्यक्ष सुनिल गव्हाणे हे मार्गदर्शन करणार आहे. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयंत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात आगामी नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या मेळाव्याला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा व विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, आशिष मोहितकर, सूर्यकांत खाडे, प्रभाकर मानकर, भरत मत्ते, अंकुश माफुर, संदीप धवणे, आशा टोंगे, विजया आगबत्तलवार, सविता ठेपाले, स्वप्निल धुर्वे, राजू उपरकर, संजय जंबे, विलास उपरे, पायल कोकास, वैशाली तायडे, अर्चना मागोहुरे, सुरेखा भेले यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केली आहे.

हे देखील वाचा: 

पाहुणे म्हणून आले आणि चोरी करून गेले !

शनिवारी वणीत ‘एक शाम राष्ट्र के नाम’ कार्यक्रम

Leave A Reply

Your email address will not be published.