नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव पोलिसांनी रेती तस्करांविरोधात रणशिंग फुंकले असून शनिवारी रात्री पुन्हा रेतीची तस्करी करणा-यांवर कारवाई केली. तालुक्यातील दापोरा पांदण रस्त्यावर मारेगाव पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले. यात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी 1 ब्रास रेती, पावडे ट्रॅक्टरसह एकूण 5 लाख 8500 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करीला उधाण आले आहे. 30 जानेवारीच्या रात्री 9 वाजताच्या सुमारात पेट्रोलिंग करीत असताना मारेगाव पोलीसांना रेती चोरीबाबत खब-याकडून टीप मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आपली गाडी चिंचमडळ कोसारा परीसरात वळवली. दरम्यान दापोरा पॉईन्ट पांदण रस्त्याने एक ट्रॅकर रेती घेऊन येताना आढळला.
पोलिसांनी या ट्रॅ्क्टरला थांबवून याबाबत चालकाकडे चौकशी केली असता विना रॉयल्टी रेतीची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टर ताब्यात घेतले. व आरोपी आरोपी विकास चौधरी (25) रा.दापोरा, रामदास चौधरी (35) चिंचमंडळ, विठ्ठल घटे (31) रा.माढळी ता.वरोरा यांना अटक केली. त्यांच्यावर भादंविच्या कलम 23/21, 379, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी
ही कारवाई पो.नि. जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.अमोल चौधरी, जमादार राजू टेकाम,अनिल बिनगुले, होमगार्ड निखिल मानकर,अंकुश जिवतोडे, शेंडे यांनी केली. शुक्रवारी मध्यरात्रीही मारेगाव पोलिसांनी 3 ट्रॅ्क्टरवर कारवाई केली होती.
हे देखील वाचा:
ज्याला शेतकरी आत्महत्या समजत नाही, तो भाबडा किंवा भामटा: चंद्रकांत वानखडे