भाजपच्या वीजबिल आंदोलनात शासकीय वाहनाचा वापर !

गटविकास अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल दरवाढ बाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी दिनांक 5 फेब्रुवारीला वणीत आंदोलन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजप कार्यकर्त्यांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी पंचायत समितीच्या शासकीय वाहनाचा वापर केल्याचा आरोप पंचायत समितीच्या शिरपूर वणी गणाच्या सदस्या वर्षा पोतराजे यांनी केला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी यांच्याकडे निवेदनातून तक्रार देखील करण्यात आली आहे. निवेदनात गटविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजबील दरवाढीबाबत महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये भाजपच्या कार्यकत्यांना आणण्याकरीता वणी पंचायत समितीच्या अधिनस्त असलेल्या शासकिय वाहनाचा उपयोग करण्यात आला. शासकीय वाहन गटविकास अधिकारी राजेश गायणार यांच्या देखरेखीत व ताब्यात असते. तसेच त्या वाहनाचा वापर पं.स.चे पदाधिकारी व गट विकास अधिकारी शासकीय कामाकरिता करतात. सदर वाहनाने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना आंदोलनात आणणे व त्यांना पोहचवून देणे अशा खासगी कामाकरिता वाहनाचा उपयोग झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राजकिय पक्षाच्या कोणत्याही आंदोलनाकरीता तसेच कार्यक्रमाकरीता शासकिय वाहनाचा उपयोग करणाऱ्यावर प्रतिबंध आहे. तसा कोणत्याही प्रकारे शासकिय वाहनाचा उपयोग करता येत नाही. असे असतांना एका राजपत्रित अधिकाऱ्याने शासकिय वाहन राजकिय कार्यक्रमा करीता देणे किंवा त्याचा तसा वापर करू देणे बेकायदेशीर आहे. सदर शासकिय वाहनाचा दुरूपयोग केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून गट विकास अधिकारी राजेश गायनर यांचेवर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेटचे पाळंमुळं शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान (भाग 3)

वणीत 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त व्याख्यान

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.