चेक बाउंस प्रकरणी 3 महिन्यांचा कारावास व 70 हजार दंड

कर्जाची रक्कम न भरणे कर्जदारास पडले महागात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कर्जाची रक्कम न भरणे तालुक्यातील एका कर्जदाराला चांगलेच महागात पडले. धनादेश अनादर (चेक बाउंस) प्रकरणी मछिंद्रा येथील एका तरुणास तीन महिन्यांचा कारावास व 70 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील रंगनाथ स्वामी पतसंस्थेने चेक बाउंस प्रकरणी कोर्टात खटला दाखले केला होता. त्यावर मारेगाव न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

मारेगाव येथील रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेतून मच्छिन्द्रा येथील प्रमोद माधवराव शेरकी यांनी जानेवारी 2014 मध्ये कर्ज घेतले होते. सदर कर्ज त्यांनी व्यवसायानिमित्त घेतले होते. या कर्जाची त्यांना 2 वर्षांमध्ये परतफेड करायची होती. मात्र प्रमोद यांनी कर्जाची परतफेड केली नाही. दरम्यान कर्ज फेडण्याबाबत कर्जदाराला वारंवार पत्रव्यवहार करून सूचना सुद्धा देण्यात आल्या. मात्र कर्जदाराने याकडे दुर्लक्ष केले.

कर्ज देताना पतसंस्था कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेचा पीडी (पुढील तारखेचा) चेक घेतात. कर्जदार कर्ज भरण्यास टाळाटाळ करत असल्याने पतसंस्थेने सदर चेक बँकेत टाकला. मात्र अकाउंटमध्ये पैसे नसल्याने सदर चेक बाउंस झाला. पतसंस्थेने सदर प्रकरण मारेगाव कोर्टात नेले.

न्यायालयाचे न्यायाधीश आशिष डि वामण यांनी निगोशबल इन्स्ट्रूमेंट अॅक्ट 1881 च्या कलम 138 नुसार प्रकरणाचा आदेश व निकाल देत प्रमोद माधव शेरकी यास 70 हजारांचा दंड व 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, रंगनाथ पत संस्थेच्या वतीने अमोल मुर्लीधर गौरकार यांनी युक्तीवाद केला.

हे देखील वाचा:

चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

यशोगाथा: मारेगाव तालुक्यातील तरुण शेतक-यांनी फुलवली झेंडुची शेती

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.