गरजुंना दिवाळीनिमित्त कपडे आणि मिठाईचे वाटप

पोलीस ठाण्यात साजरी झाली आगळी वेगळी दिवाळी

0

निकेश जिलठे, वणी: बुधवारी वणी पोलीस स्टेशनमध्ये गरीब मुलांना कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. दिवाळी निमित्त फटाक्यात पैसे न गुंतवता ते पैसे कल्याणकारी कार्यात कामी यावे यासाठी दै. सिंहझेपचे सुरज चाटे व राजु गव्हाणे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

जाहिरात

दरवर्षी फटाके फोडून पैशांची उधळपट्टी केली जाते. याऐवजी त्या पैशातून गरीब मुलांची दिवाळी साजरी व्हावी यासाठी गरीब मुलांना दिवाळीनिमित्त उपहार देण्याची कल्पना मांडण्यात आली. त्यानुसार सुरज चाटे व राजु गव्हाणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. बुधवारी गरीब मुलांना  वाहतूक पोलीस निरिक्षक संग्राम ताठे, राकेश खुराना, सुनिल कातकडे, अविनाश भुजबलराव, आरिफ भाई, गेडाम यांचे हस्ते कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं.

जाहिरात

यावेळी शेख, सचिन नागपुरे, सतीश गेडाम, शेख रहीम, मारोती खडतकर, विजय गव्हाणे व पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारी तसेच मित्र परिवार उपस्थित होते.

जाहिरात

 

जाहिरात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.