रासा येथे कृषी योजना मार्गदर्शन व वसुली मेळाव्याचे आयोजन

167 शेतकऱ्यांनी भरले 18 लाख रुपये

0

सुशील ओझा, झरी: 4 मार्च रोजी झरीजामणी उपविभागातील रासा येथे सरपंच रत्नमाला ठावरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन व महावितरण मार्फत राबविल्या जाणाऱ्या “कृषीपंप वीज जोडणी धोरण-20” बाबत जनजागृती व कृषी वीज बील वसुली मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सर्व प्रथम महावितरण यवतमाळ मंडळचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी व पांढरकवडा विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य यांनी उपस्थितांना योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली व या योजनेचा लाभ घेण्याची विनंती केली. अधिक्षक अभियंता मडावी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत परिसरातील 32 कृषी ग्राहकांनी एकूण 5 लाख 32 हजार 200 रुपयांचा भरणा केला.

या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित गावातील मुख्याध्यापक गजानन जेऊरकर यांनी विचार व्यक्त करतांना “विजेची मागणी करणे हे ग्राहकांचे अधिकार असून, वीज बिलाचा नियमित भरणा करणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे” असे म्हटले.

आता पर्यंत उपविभागातील 167 शेतकऱ्यांनी या योजने अंतर्गत भाग घेऊन सुमारे 18 लाख रुपयाचा भरणा केलेला असून आपण सगळ्यांनी याचा लाभ घेऊन आपले वीज बील कोरे करावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता राठोड यांनी केले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी महावितरण झरीजामणी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड, सहा. अभियंता शेख, नंदलवार, लटारे, कर्मचारी रमेश गोटा, शेरकुरे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

चोरट्यांचा थेट मंदिरावरच डल्ला, फोडली दानपेटी

घरचे गेले कामानिमित्त बाहेर, मुलीने केली आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.