विवेक तोटेवार, वणी: मागील तीन महिन्यापासून देशातील बळीराजा हा कृषी कायदे मागे घेण्यासाठी रस्त्यावर आला आहे. परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदा हा शेतकऱ्याच्या विरोधात असल्याने तो त्वरित मागे घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन शुक्रवार 5 मार्च वंचित बहुजन आघाडीद्वारे रोजी राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
सर्व जगाचा पोशिंदा बळीराजा हा मागील तीन महिन्यांपासून कृषी कायदे मागे घेण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. या घटनेचा वंचित बहुजन आघाडीद्वारे जाहीर निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले तीनही कायदे मागे घेण्यात यावे. शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याकरिता हे कायदे करण्यात आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र भर या कृषी कायद्यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला वणी तालुक्याने आपला पाठिंबा दर्शविला आहे. व अशा आशयाचे निवेदन शुक्रवार 5 मार्च रोजी राष्ट्रपती याना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे. जर मागण्या त्वरित मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर मंगल तेलंग, कपिल मेश्राम, प्रशिल तामगाडगे, अनिल जांभुळकर, भारत कुमरे, अमोल टोंगे, पीडब्यू खान, बीएल पाटील, बीडी राऊत, इडब्यू रासेकर, अनुप काटकर, किशोर मून इ. यांच्या सह्या आहेत.
हे देखील वाचा: