ओमप्रकाश हंसराज चचडा: राजकारण, समाजकारणातील भीष्माचार्य
ओमप्रकाश चचडा यांचे आज 72 व्या वर्षात पदार्पण
वणी बहुगुणी डेस्क: ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपल्याला काही देणे आहे याचे भान ठेवून समाजकार्य करणारे व्यक्ती आज मिळणे विरळच आहे. कोणताही बडेजाव न मिरवता सतत कार्य करणे, व्यवसाय नाही तर साधना म्हणून कार्य करणे, अनेकांना दिशादर्शक म्हणून कार्य करणे, लोकसेवा हेच ज्यांनी सेवा मानली असे शहरातील व्यक्तीमत्व म्हणजे ओमप्रकाश हंसराज चचडा. गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात परिचयाचे व नवतरुणांना कायम मार्गदर्शक असलेलं हे पितृतुल्य व्यक्तीमत्व आज 72 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त हा खास व्यक्तीलेख
राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्र या तिन्ही क्षेत्रात ओमप्रकाश चचडा यांनी आपला ठसा उमटवला. आज ते छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून आजही शिक्षण क्षेत्रात जोमाने कार्य करीत आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा वणी आणि मारेगाव येथे शाळा आणि कॉलेज आज सुरू आहे.
आज जरी त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली असली तरी आजही ते राजकारणात एक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 15 वर्ष सलग नगरसेवक पद भूषवले. याशिवाय ते वणी नगर पालिकेचे उपाध्यक्षही राहिले आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद तर वसंत जिनिंग को ऑप.चे मॅनेजिंग डिरेक्टर म्हणूनही त्यांनी कार्यभार यशस्वीरित्या पार पाडला आहे.
आपण ज्या समाजात जगतो त्याचे आपल्याला काही देणं असतं. याचा विसर त्यांनी कधीही पडू दिला नाही. ज्या समाजातून ते आले त्या समाजाला कसे पुढे नेता येईल याचा त्यांची त्यांनी कायम जाणीव ठेवली व जे सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक या क्षेत्रात जे काही करता येईल त्यासाठी ते कायम झटत आले. शहरात समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
राजकारण, समाजकारण, शिक्षण, व्यवसाय इत्यादी क्षेत्रातील त्यांचा हा वारसा त्यांचे मुलं, पुतण्या य़शस्वीरित्या पुढे नेत आहेत. अशा या राजकारण, समाजकारण व शैक्षणिक क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ओळख असलेल्या ओमप्रकाश चचडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
शुभेच्छुक:
श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था परिवार वणी
शिक्षक व शिकतेत्तर कर्मचारी वणी व मारेगाव
विक्रांत चचडा मित्रमंडळ