बहुगुणीकट्टा: पुरुषप्रधानता स्त्री स्वातंत्र्याला कारणीभुत

पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार करणारा कोमल मानकर यांचा लेख

0

माणूस कितीही शिकला, ज्ञानाची कक्षा कितीही रूंदावली आणि विज्ञानानं अफाट प्रगती केली असली, तरी स्वतः ला माणूस म्हणून घ्यायला आपण लायक आहोत का? स्त्री किंवा पुरूष म्हणून जन्माला येणे प्रकृती पण विचाराला प्रगतशील करताना उडणारी ताराबळ ही विकृत सुरक्षततेची ‘चिलखतं’ इथंच येते वाट्याला…

आपल्या देशात पुरूषालाच सर्वश्रेष्ट स्थान दिले आहे. आपल्या डोळ्यावर हजारो वर्षाच्या परंपरांचा चष्मा असतो. हा चष्मा म्हणजे एवढा दैनदिन सवयीचा अविभाज्य भाग होतो की तो काढून बाजुला सरसावतो म्हटलं तरी डोळ्यासमोर अंधारी व मेंदूला झिणझिण्या येतात. तोच चष्मा चढवत परत माणूस आपल्या वाटेने चालता होतो. ती वाट चुकीची जरी असली तरी समाजमान्य असते म्हणून माणूसही त्या वाटेने भरकटत जातो. बाईपणाचं हळवं सादरिकरण आणि पुरुषपणाचा रूबाब ह्याची सळमिसळीत बेरीज केली तर स्त्रीला आखलेली बंधनाची सिमारेखा ओलांडत ती उबरंठ्याच्या बाहेर पडत आहे.

लग्न न करणारी स्त्री जेव्हा लग्ननावाच्या बेगडीत अडकते तिथूनच तिला तिच्या अस्तित्त्वाची स्त्रीपणाची जाणीव होते पुरुषी अंहकाराची आणि मायेच्या माणसाचीही…

भारतासारख्या देशात जिथं पुरुषप्रधान संस्कृती भिनली आहे तिथं खरचं आजही स्त्रीला स्वातंत्र्य मिळाल का? मिळालं तर आजही स्त्रीला भारतात देवीच रूप मानल्या जाते, दुर्गा उत्त्सव साजरी करणारी ही पुरुष मंडळी मग लग्नात स्त्रीला का स्वत:च्या पाया पडू देते. स्त्रीची जागा पुरूषाच्या चरणावर का? कारण ती तर खांद्याला खांदा लावून पुरूषासारखी काम करते. घर सांभाळून नोकरी करणार्या ही स्त्रिया आहेत ह्या समाजात. चुल सांभाळून मुल सांभाळा तरी तिजोरीची चांबी ही पुरुषाच्याच हाती असतेना.

 

मनुस्मृती सारख्या ग्रंथ पुराणातुन स्त्रीचे स्वातंत्र्य बांधल्या गेले आहे. मनुने तर स्त्रीला चक्क शुद्रात मोडले. इतकेच नाही तर स्त्रीने स्वत:चे विचार ही मांडायचे नाही.
बाल्या वा युवत्या वा 
वृध्दया वापि योषिता !
न स्वातंत्र्येन कर्तव्य किंचित्कार्य गुन्हेण्यपि ।
स्त्रीने लहानपणी पिण्याच्या छत्राखाली रहावे, तरूणपणी पतीच्या म्हातरपणी मुलाच्या स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र्यवृतीने तिने कधी जगचू नये का?? तिचे स्वातंत्र्यच तिच्या पासून हिरावून घेतले. एका पुराणग्रंथाच्या चालीरितीत इथल्या पुरुषाने स्वतः ला झोकून दिले काय ?

पुरूषी वर्चस्व प्रस्थापित राखून ठेवण्यासाठी आज ही तिला मोठ्या मंदिरात गेली तर दुरून पाया लागालं लागते. कुठे तर तिला मंदिराच्या पायरीवरही प्रवेश नाही. अरे देवाला स्त्री चालत नाही मंदिरातला देव तुम्हाला हे सांगायला येतो का ? स्त्रीच्या सावलीचा ही देवाला विटाळ तर निसर्गाने स्त्रीची उत्पत्ति केलीच कशाला ? आज ही शनी मंदिरात स्त्रीला प्रवेश नाही भारतात राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसणारी स्त्री शिक्षण मंत्री ही ती आणि मंदिराचा गाभारा तिच्यासाठी नाही म्हणजे हे स्त्री ने ठरवले का की पुरुषानी तिच्यावर बंधने लादली. नऊ महिने उदरात वाढलेला गर्भातल मुल पवित्र वाटते आणि मासिक त्रासातून जाणार्या तिचा संवेदनाचा विचार न करता ती स्त्री ह्या समाजाला अपवित्र वाटते. आजही चार दिवस अलग बस म्हणारा समाज ह्या देशात कमी नाही. ही बंधने ही त्या पुरातन काळा पासुन पुरूष स्त्रीवर लादत जातो मुकट्याने ती ह्या बंधनात अडकून पडलेली आहे.

एका पुरूषाचे शिक्षण हे बहुधा त्याचे एकट्याचे शिक्षण ठरवले जाऊ शकते, पण एका स्त्रीचे शिक्षण हे भावी पिढीचे शिक्षण असते. आज सांगा कोणत्या कायद्यात असे लिहून ठेवले आहे की स्त्रीने मंगळसुत्र घालाच ? मंगळसुत्र घातल म्हणजे नवरा जिवंत आहे, नाही तर तो नाही असे होईल का ? लग्न झाल्यावर तुम्ही कायद्याने पती पत्नी बनताच नं ! लग्न मग पुरुषाचेही होते पण त्याला अशी कुठलीच बंधने नाही. काळ्या मण्याचा धागा स्त्री रिवाज म्हणून कमी आणि बंधन म्हणून जास्त घालते. एक दिवस कपाळाला टिकली नाही लावली लग्न झालेल्या स्त्रीने तर सासूची आणि इतरांची कुजबुज सुरू होते. नवरा मेला तर विधवा स्त्रीने साधी टिकली जरी लावली तर हाच समाज असतो ना तिच्याकडे तुच्छेतेच्या नजरेने बघणारा…

म्हणजे समाजाणेच तिच्यावर ही बंधने लादायची आणि समाजानेच ती हिरावून घ्यायची. वेद्, पुराण, ऋग्वेद, मनुस्मृती ह्या विचाराणा आजही पुरुष मंडळी सहमती देतात. घरातल्या स्त्रीचा विचार नसतो पण त्याच्या मस्तकातून वेद पुराण जात नाही. आणि म्हणतात देवाला स्त्रीची सावली चालत नाही ? त्याची कारणे ….

नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, व्रुद्धा कोणत्याही स्वरुपात असो. ती कधीच स्वतंत्र रहायला नको असे स्मृतीत सांगितले आहे. ते काही मुद्दे… पती पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो, विकु शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही स्थिती मध्ये, विवाहानंतर, पत्नी सदैव पत्नीच रहात असते. संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही, शुद्रांच्या स्त्रियासुद्धा “दास” आहेत, स्त्रीला संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही, स्त्रीच्या संपत्तीचा मालक तिचा पती, पूत्र, किवा पिता असेल. ढोर, गवार, शूद्र आणि नारी, हे सर्व ताडन करण्या योग्य आहेत, म्हणजे स्त्रीयांना ढोरा सारखे मारता येऊ शकते. असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते, त्याच प्रकारे स्त्रियां सुद्धा अपवित्र असतात, शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही …..

स्त्रियां शेवटी नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही. (यामुळे म्हटल्या जाते-“नर्काचे द्वार”) यज्ञ कार्य करणा-या किंवा वेद मंत्र बोलणा-या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज मानावे, स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असल्याने देवांना स्वीकार्य नाहीत. मनुस्मृती प्रमाणे, स्त्री पुरुषांना मोहित करणारी असते. स्त्री पुरुषांना दास बनवून पदभ्रष्ट करणारी असते. स्त्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते. स्त्री संभोगाप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुपता सुद्धा बघत नसते. स्त्री चंचल आणि हृदयहीन, पति शी एकनिष्ठ न राहणारी असते .स्त्री केवळ शैया, आभुषण आणि वस्त्र यावरच प्रेम करणारी, वासनायुक्त, बेईमान, इर्षाखोर, दुराचारी असते.

सुखी संसारासाठी स्त्रीयांसोबत कसे रहावे या साठी मनु सांगतो-
स्त्रीयांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे चाहिए.
पति दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो, दुर्गुणांचे भांडार असो, नंपुसंक असो, कसाही असला तरीही स्त्री ने पतिव्रता होऊन देवा सारखी त्याची पूजाच करायला पाहिजे. पण त्याहीपेक्षा ज्या मराठी साहित्यात असे म्हटले जाते की एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते. ह्याच अशा विचाराना आजही पुरूष थारा देतो कुणालाही स्त्री बद्दलचे असे फसवे मत एखाद्या स्त्रीला राग येणारे आणि विरोधाभास दर्शविणारे आहे..

चाली रूडी पासून पुरुषाने तिला बंधनात ठेवले. स्त्री दिवसा आदीशक्तीच रूप नारी असते आणि रात्र होताच पुरूषी शक्तीचा प्रयोग चालतो. पण स्त्रीने निमूट पणे सर्व का सहन करत बसायचे. काय चांगलं काय वाईट हे स्त्रीनेही समाजाला समजावून सांगायला पाहिजे. लग्नात एका दिवसाच्या झालेल्या नवर्याच्या पाया पडायच्या कारण तो मरेपर्यत तुमचा नवरा असतो मग आर्त व्यक्तित्मत्व कसं ही असो नवऱ्याच्या पाया पडणे खरचं जर का शास्त्रीय कारण समजल्या जात असेल तर त्यालाच पुजत रहायला हवे. मग तो लग्न होऊन दारू पिऊन मारणारा निघो. तो ह्या असल्या चालीरिती समाजातुन बंद का नाही होतं ? पाया पडायच्याच आहे तर मुलीनो जे तुम्हाला शिकवतात लहानच मोठ करतात त्या आई वडिलाच्या पाया पडा आणि ह्या फेकलेल्या पुरातन विचाराचा विरोध करा. नाहीतर तुमच्या स्वतंत्र्याला पुरुषप्रधानते सोबत तुम्ही ही कारणीभुत असाल. शास्त्र सांगणार्यांनी तर एकेकाळी स्त्रीला सती चढवले होते.

✍ कु. कोमल प्रकाश मानकर

++++++++++

वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलसाठी आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तसंच तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी

संपर्क : निकेश: 9096133400

Email id: [email protected]

 

Leave A Reply

Your email address will not be published.