पांढरदेवी येथे जंगी गायगोधन, गायी नाचतात तल्लीन होऊन
पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी येतात ठिकठिकाणाहून लोक
ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गायगोधनला जंगी कार्यक्रम होतो. यात तालुक्यातुन गायपालक फक्त गायींची पूजा करण्यासाठी येतात. यावर्षीही शेकडो गायपालकांनी इथे गायीची पूजा केली. पांढरदेवी येथे असलेल्या हेमांद्री पंथी मंदिराच्या प्रागंणात अनेक वर्षापासून गायगोधन मोठ्या उत्साहात साजरा होतो.
शेतकरी बांधव गायगोधनाच्या दिवशी अापल्या गाईला सजवून या ठिकाणी वाजत गाजत आणतात. तिथं आणल्यावर त्यांची विधिवत पूजा केली जाते. नंतर गायीला मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर वाद्यांच्या तालावर गायी नृत्य करतात. गुराख्याच्या इशार्यावर काही काळ गायी मंदिरा समोर बसतात. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातुन जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक येतात.
अशी आख्यायीका आहे की या ठिकाणी पांडवाच काही काळ वास्तव्य होतं. त्यावेळी याच दिवसी पांडवानी युद्ध जिंकल्यावर गायींना सोबत आणून या ठिकाणी विसाव्या साठी बसविलं. तेव्हा पासून या ठिकाणी गायगोधन यात्रेची परंपरा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.