परसोडा घाटावरील रेती तस्करी थांबविण्या करिता रस्त्यावर खोदले खड्डे
तहसीलदार जोशी व नायब तहसीलदार खिरेकर यांचे प्रयत्न
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील ४ व पिंपरड वाडी येथील ३ असे सहा ते सात रेती तस्करांनी कहर केला असून तहसीलदार यांना न जुमानता मुजोरी धोरण अवलंबून खुलेआम दिवसरात्र रेतीची चोरी करून तस्करी करीत आहे. तालुक्यात घर,दुकान व इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून याचा फायदा वरील दोन्ही गाववतील रेती चोरटे विक्री करीत आहे. तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यान8 रेती चोरटयाना पकडण्याकरिता अतोनात प्रयत्न केले परंतु “घर का भेदी लंका ढाये” सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा: