जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 66 रुग्ण आढळले आहेत. यात वणी शहरातील 26 रुग्ण तर ग्रामीण भागात 36 रुग्ण आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण व वरोरा आणि झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आला आहे. आजची आनंदाची बाब म्हणजे आज तब्बल 96 पॉझिटिव्ह कोरोनामुक्त झाले. सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 430 झाली आहे. दरम्यान आज यवतमाळ येथे 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात 53 वर्ष व 35 वर्षीय महिला तसेच एका 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आजपासून राज्यशासनाने लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले आहे. हे नवीन नियम आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
आज वणी शहरात हिराणी ले आऊट व विठ्ठलवाडी येथे 4 रुग्ण, कनकवाडी येथे 3 रुग्ण तर टिळक नगर, यश अपार्टमेंट येथे 2 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय रंगनाथ नगर, सावरकर चौक, सुभाषचंद्र बोस चौक, टागोर चौक, बेलदारपुरा, इंदिरा चौक, जटा शंकर चौक, प्रगती नगर, सिंधी कॉलनी, जैन ले आऊट, भोंगळे ले आऊट, दामले फैल येथे प्रत्येकी 1 रुग्ण असे एकूण 26 रुग्ण आढळून आले आहे.
ग्रामीण भागात आलेल्या 36 रुग्णांमध्ये नांदेपेरा येथे 6 रुग्ण तर राजूर वार्ड क्रमांक 5, भांदेवाडा, छोरीया ले आऊट येथे प्रत्येकी 3 रुग्ण तर पुरड, लालगुडा, बेलोरा, चिखलगाव, भालर, निळापूर येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. मेंढोली, वागदरा, परसोडा, दहेगाव, उमरी, शेलू, मोहदा, बोरगाव, शिंदोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. याशिवाय मारेगाव येथील 2 व्यक्ती व वरोरा आणि झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 व्यक्ती वणी येथे पॉझिटिव्ह आले आहेत.
आज यवतमाळ येथून एकही अहवाल प्राप्त झाला नाही. आज 311 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 66 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज एकाही संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप यवतमाळहून 1009 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 430 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 24 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 358 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 48 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2417 रुग्ण आढळून आलेत. यातील 1947 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 40 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
आज मध्यरात्रीपासून नवीन नियम लागू
राज्य शासनाने लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करत नवीन नियमावली जाहीर केली आहे. यावरून जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमीत केले आहे. नवीन नियमांनुसार आता सर्व शासकीय कार्यालयात आता 15 टक्के उपस्थिती राहणार आहे. लग्न सोहळ्यात केवळ 25 लोकांची अनुमती देण्यात आली आहे. तसेच हा समारंभ केवळ दोन तासांमध्ये आटोपता घ्यावा लागणार आहे. याचे उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. जिल्ह्याबाहेर प्रवास केल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. यासह 14 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेले इतर नियम लागू राहतील.
हे देखील वाचा: