विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे रविवार 16 मे दुपारी 12 वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. आरोपी हा पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरी गेला व तिच्या मागे जाऊन त्याने तिचा विनयभंग केला. आरोपीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी स्वप्निल बंडू रिचनकर (25) रा. विरकुंड येथे राहतो. त्याची शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर नजर होती. रविवार 16 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पीडितेच्या घरी कुणीही नव्हते. याचा फायदा घेत आरोपीने पीडितेच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने गेला.
पीडितेला स्वप्निलने पाणी मागितले. पीडिता ही पाणी आणण्यासाठी घरात गेली. तिच्या मागे आरोपीही गेला व तिला मागून पकडून तिचा विनयभंग केला. रविवार सायंकाळी पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन वणी पोलिसात तक्रार दिली.
तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी स्वप्निलवर भादंविच्या कलम 452, 354 (अ) 1 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माया चाटसे करीत आहे.
हे देखील वाचा: