मुकूटबन पोलीस ठाणे अंतर्गत क्षेत्रात अवैध धंदे बंद ?
ग्रामीण भागातील दारुबंदीचा निर्णय पोलिसांसाठी ठरली डोकेदुखी
रफीक कनोजे, झरी: मागील तीन महिन्यांपासुन मुकूटबन पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येक गावात संपूर्ण अवैध धंदे बंद असल्याचा दावा करण्यात येतोय. तर पाटण परीसरात अवैध देशी दारु वर लगाम कसण्यात आली आहे. पण ग्रामीण भागातील दारूबंदीचा निर्णय पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
20 जूनला पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी मुकुटबन ठाण्याचा प्रभार स्वीकारला. त्यापूर्वी ठाणेदार असलम खान यांच्या कारकिर्दीत मुकुटबन परिसरात अवैद्य धंदे जोमात सुरू होते. ठाणेदार वाघ यानी प्रभार घेतल्यानंतर काही दिवसांतच कोण कोणत्या गावात अवैध धंदे सुरू आहे याची माहिती बीट अधिकाऱ्यांकडून घेतली. मुकुटबन येथील महिलांनी अवैध धंदे बंद करण्याविषयी तक्रार आणून दिली. त्यानंतर थानेदार वाघ यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्णपणे अवैध धंद्यावर लगाम करण्यास सुरुवात केली.
अवैध धंदे चालवणा-याविरोधात कारवायी करुन परीसरातील १६ लोकांना तडीपार केले. आजच्या घडीला मुकुटबन ठाणे अंतर्गत ६१ गावांमध्ये कुठेही अवैध देशी दारू व मटका काउंटर चालू नसल्याचं बोललं जातं. कुठेही पोलिसांकडुन मुकसंमत्ती दिली जात नाही. ह्यापुर्वी कोणत्याही ठाणेदाराने आजपर्यंत समुळ अवैध धद्याचे उच्चाटन केले नाही ते काम ठाणेदार वाघ यांनी चार महिन्यात केले असल्याचं सर्वसामान्यांचं मत झालं आहे.
ग्रामीण भागातील दारुबंदीचा निर्णय पोलिसांसाठी ठरली डोकेदुखी
पोलिसांच्या मुक सहमती ने चालणारी अवैध देशी दारुची विक्री मुकूटबन आणि पाटण पोलीस अधिकार्यांकडुन तर बंद करण्यात आली. याचा फायदा घेत मद्यपी मिळेल तिथून आपले शौक पूर्ण करून चार ते पाच दारूच्या बॉटल गावात आणुन दाम दुप्पटीने विकतात. असे चिल्लर विक्रेते प्रत्येक गावात झाले आहेत.
मानवाधिकार आयोगाने दिलेले हक्क आणि दारु पिण्याचा परवाना ह्यामुळे पोलिस सुध्दा कारवाई करु शकत नाही. ह्याचा फायदा प्रत्येक दारु पिणारा परवानाधारक घेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारुबंदीचा निर्णय पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.