अखेर वृद्धाच्या मृत्यूचं गुढ उलगडलं

मुकूटबन बस स्टॅन्डजवळ आढळला होता मृतदेह

0

रफिक कनोजे, झरी: बस स्टॉप व आठवडी बाजार परिसरात सफाई करणारा वयोवृद्ध रामदास वरगंटीवार (75) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात बस स्टॅण्ड चौकात आढळून आला. बस स्टॅन्डवर मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी काहींनी हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर काहींनी हा अपघात नसून खून असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढलं होतं. पण अखेर शवविच्छेदनाचा अहवाल आला असून या प्रकरणाचं गुढ आता उलगडलं आहे.

हा अपघात असून कोणत्यातरी अज्ञात वाहनाचा त्यांना धक्का लागला, त्यामुळे ते तडफडत फिरले असेल असा प्राथमिक अंदाज ठाणेदार वाघ यांनी व्यक्त केला होता. प्राप्त शवविछेदनाच्या अहवालानुसार रामदासचा मृत्यू अवजड वस्तू डोक्याला लागून झाला असावा व त्याचा मृत्यू रात्री १२ ते १ च्या दरम्यान झाला असावा, असा अहवाल प्राप्त झाला आहे.

रामदास ला मुलबाळ नसून कोणीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलीस स्वतः फिर्यादी बनुन त्याचा अपघात कशाने झाला व कोणत्या वाहनाने झाला हा तपास करतील काय? सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नेहारे (पोलिस उप निरीक्षक), नैताम जमादार, टोंगे जमादार, संदीप सोयाम, नीरज पातुरकर, प्रदीप कवरासे, ताडकोकुलवार हे करीत आहे .

(हे पण वाचा -वृद्धाचा आढळला बस स्टॅन्ड जवळ मृतदेह, घात कि अपघात ?)

ह्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. रामदासचा मृत्यू कशाने झाला हे तपासात निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येइल व आरोपीस अटक करण्यात येइल – गुलाबराव वाघ, पोलीस निरीक्षक पो. स्टे. मुकूटबन

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.