सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील दोन विनापरवाना रेती भरुन वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी 25 मे रोजी सकाळी 6.15 वाजता मुकुटबन पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी याना दोन ट्रॅक्टर रेती भरून जात असताना आढळले. ट्रॅक्टर चालक याला रेती वाहतुकी बाबत परवाना आहे का विचारले असता कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा रॉयल्टी नसल्याने दोन्ही ट्रॅक्टर पोलीस स्टेशन ला आणून जमा केले.
या प्रकऱणी चालक सचिन संजय माथुलकर (25) रा. दहेगाव याला अटक करून ट्रॅक्टर मालक भाऊराव नामदेव वासेकर वय 55 तसेच दुसरा चालक किशोर सुरेश उलमाले वय 23 वर्ष रा दहेगाव व ट्रॅक्टर मालक बाळकृष्ण ठावरी वय 21 रा. गोडगाव इजासन या चारही आरोपींवर कलम 379, 188, 34, भादंवि कलमासह जमिन महसूल कायदा कलम 48 व पर्यावरण संरक्षण अधिनयमांतर्गत 45 कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला.
ट्रॅक्टर (MH 29 AD8612) ट्रॉली क्र नाही. तर दुसरा ट्रॅक्टर ज्याला नंबर नाही तर ट्रॉली क्र, (MH 29 C 7228) आहे. दोन्ही ट्रॅक्टर किंमत 9 लाख व प्रत्येकी ट्रॅक्टर मधील 1 ब्रास अशी दोन ब्रास रेती 12 हजार असा एकूण 9 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही जमादार प्रवीण तालकोकुलवार, खुशाल सुरपाम, पुरुषोत्तम घोडाम व संदीप बोरकर यांनी केली आहे तर तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण तालकोकुलवार करीत आहे.
अश्याच प्रकारच्या रेती चोरी साखरा जवळील नाल्यातून खुलेआम 8 ते 10 ट्रॅक्टर द्वारे व शिंदीवाढोना जवळील नाल्यातून 6 ते 7 दिवस रात्र खुलेआम रेतीचोरी सुरू आहे. बोपापुर, साखरा, सिंधीवाढोना, कोसारा, दरा व मुकुटबन येथील ट्रॅक्टर चालक असून यांच्यावरही पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
हे देखील वाचा: