जितेंद्र कोठारी, वणी: लपून छपून जुगार खेळणा-यांवर शिरपूर पोलिसांनी आज रविवारी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या करण्यात आलेल्या या कारवाईत 11 जुगा-यांना अटक करण्यात आली. यातील एक कारवाई ही शिरपूर येथे तर दुसरी कारवाई गोपालपूर येथे करण्यात आली. या कारवाईत 1 लाख 87 हजार 720 रुपयांचा मुद्देमाला जप्त कऱण्यात आला. एकीकडे तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरू असतानाही जुगार मात्र जोमात सुरू होता.
शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांना शिरपूर येथील संजय निब्रड यांच्या शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरू त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तिथे 7 व्यक्ती रंगेहात सापडले. महादेव जनार्धन पाचभाई (50), सतिश देवाजी गुरनूले (52), राजू शामराव ठेंगळे (44), संजय नामदेव पाचभाई (25), दिवाकर विठ्ठल घोरुडे (43), अविनाश प्रभाकर निभुते (32), सुभाष लटारी कन्नाके (48) यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व शिरपूर येथील रहिवाशी आहेत.
सदर आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण नगदी 4500 रु. तीन मोटार सायकल व किंमत प्रत्येकी 50 हजार रुपये व तीन मोबाईल किंमत 25 हजार रुपये असा एकूण 1 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला.
दुसरी कारवाई ही तालुक्यातील गोपालपूर येथे करण्यात आली. गावातील एका गोठ्यात काही लोक जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला असता यात देवेंद्र कृष्णाजी वांढरे (42), मनोहर गोविंदा नवघरे (53), पाडुरंग भिवाजी नवघरे (71), मारोती गणपत नवघरे (67) अशा चौघांना अटक कऱण्यात आली आहे. हे सर्व आरोपी गोपालपूर तालुका वणी येथील रहिवाशी आहेत. या कारवाईत आरोपीच्या अंगझडतीत एकूण 8220 रु नगदी मिळाले.
दोन्ही कारवाई मिळून पोलिसांनी 1 लाख 87 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधिक्षक धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुले, रामेश्वर कांडुरे, गंगाधर घोडाम, सुनिल दुबे, गुणवंत पाटील, सुगत दिवेकर, राजु शेन्डे यांनी केली.
हे देखील वाचा: