वणी-पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे भोवणार ..!

अवैध धंद्यावर विशेष पोलीस पथकाची राहणार करडी नजर

1

जितेंद्र कोठारी, वणी : जिल्ह्यात सर्वात जास्त वरकमाईसाठी सुपरिचित वणी उपविभागात अवैध धंंद्यांवर अंकुश बसविण्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. वणी उपविभागात वणी व शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी, कोळसा चोरी, मटका, क्रिकेट जुगार, अवैध दारु विक्री व इतर अवैध धंदे सुरु असल्याची अनेक तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली होती. तसेच पांढरकवडा उपविभागात पांढरकवडा, घाटंजी, वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणा येथे गौवंश तस्करी बाबतची तक्रारीही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती.

Podar School 2025

अवैध धंद्यांबाबत तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नुकतेच शिरपूर पोलीस ठाण्यात नेमणूक झालेले सपोनि मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाचे गठन केले. पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडेसह जमादार राजू बागेश्वर, निलेश भुरे, अजय वाभीटकर, मुकेश करपते, मिथुन राऊत व जितेश पानघाटेची नियुक्ती पथकात करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी शहरातील दीपक टॉकीज चौकात स्थित पोलीस चौकीत या विशेष पथकाचे कार्यालय राहणार आहे. वणी उपविभागातील वणी, शिरपूर, मुकुटबन, पाटण व मारेगाव तसेच पांढरकवडा उपविभागात पांढरकवडा, वडकी, राळेगाव, घाटंजी व पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर या विशेष पथकाची करडी नजर राहणार आहे.

अवैध धंद्यावर आळा बसविण्यासाठी तसेच गंभीर गुन्ह्याची तपास करण्याकरिता वणी येथे गुन्हे शोध पथक कार्यरत आहे. डीबी पथकाने अनेक मोठी कारवायासुद्दा पार पाडली. मात्र रेती तस्करी, कोळसा चोरी व मटका व्यावसायिकांवर कारवाई करताना स्थानिक पोलिस नेहमी ‘सॉफ्ट कॉर्नर’ ठेवत असल्याचे आरोप होत राहिले.

तब्बल अडीच महिन्यापूर्वी वणी येथे भरदिवसा 45 लाखांची रोड रॉबरीचे 4 ते 5 आरोपी अद्यापही वणी पोलिसांना गवसले नाही. तर 18 मार्च 2021 रोजी अवैधरीत्या खाजगी कोळसा डेपोवर 3 ट्रक मधून अनलोडिंग होत असलेले तब्बल 75 टन कोळसा जप्ती प्रकरणीही स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेदेखील वाचा

आज वणी तालुक्यात 9 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

जि. प. सेस फंडातून विविध साहित्यांचे वाटप

हेदेखील वाचा

धक्कादायक: जिवंत असलेला शेतकरी शासन दरबारी मयत

Leave A Reply

Your email address will not be published.