अजब भूमिअभिलेख कार्यालयाचा गजब प्रकार
कर्मचारी गैरहजर तर कार्यालयाला ठेवले कुलूप बंद, अखेर SDO च्या आदेशाने उघडले गेट
नागेश रायपुरे, मारेगाव: अजब कामाचा गजब प्रकारासाठी नेहमी बहुचर्चित असलेल्या मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात तर आज अर्ध्याहून जास्त कर्मचारी गैरहजर होते. तर येथील नवीनच अधीक्षकाचा पदभार घेतलेल्या अधिकाऱ्यांनी चक्क कार्यलयाच्या मुख्य गेटला कुलूप बंद करून ठेवण्याच्या सूचना दिल्याने, कामासाठी सकाळपासून गेलेल्या शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे काम होत नसल्याने त्यातच गेटला कुलूप बंद ठेवल्याने रोष व्यक्त केला.
अखेर येथील दुष्यंत जयस्वाल यांनी वणी येथील SDO यांना हा प्रकार भ्रमणध्वनी वरून सांगताच गेट उघडण्यात आले. सध्या खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणारे अनेक कागदपत्रे भूमि अभिलेख कार्यालयातून मिळत असते. मात्र येथील कामे वेळेवर होत नसल्याने नागरीक पुरते संतप्त झाले आहे.
आज तर कार्यालयाचे मुख्य दार चक्क कुलूप बंद ठेवण्यात आले.आलेल्या नागरिकांना कर्मचारी उपस्थित नसल्याचे कारण सांगून कामासाठी हुलकावणी देण्यात आली. उपस्थित शेतकरी संतप्त होऊन तहसीलदारांकडे तक्रार दिली. मात्र गेट उघडण्यात नाही नाही. अखेर दुष्यंत जयस्वाल यांनी थेट वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना कॉल करून हा सर्व प्रकार सांगितला असता उपस्थित कर्मचाऱ्यांला कुलूप उघडण्याचे आदेश दिले.
मारेगाव येथील कार्यालयात वेळेवर कधीच काम होत नसल्याची ओरड नागरिका कडून होत आहे.अश्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना साथ आजाराचा आधार घेत कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी कुठलीही उपाय योजना न करता कामासाठी येणारे नागरिक आत येऊ नये म्हणून प्रभारी अधिकाऱ्याच्या अजब आदेशाने मुख्य दरवाजा बंद केल्याच्या घटनेने शुक्रवारला कार्यालयीन कामासाठी आलेले नागरीक बंद असलेल्या गेट मुळे संतप्त झाले, त्या वेळी कार्यालयात केवळ दोनच कर्मचारी उपस्थित होते. दांडी मारण्यात पटाईत असलेल्या कर्मचाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याचे बोलले जाते .
सध्या सुरु होत असलेल्या खरिप हंगामात शेतकरी कामात व्यस्त असतो. त्यामुळे येणाऱ्या नागरीकांची कामे वेळेत व्हावी या अपेक्षेने तालुक्यात नागरीक येतात, मात्र कामे विलंबाने होतात.
नागरीकांचे नक्कल , मिळकत पत्रिका, फेरफार, नकाशाचे अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याचे बोलल्या जात आहे. शुक्रवारच्या गेट बंदच्या प्रकाराने उपस्थित नागरीक संतप्त झाले, गेट बंद करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना करून येथील दुष्यंत जयस्वाल यांनी थेट उपविभागिय अधिकारी वणी यांना कॉल करून त्यांच्या अधिकारात नागरीकासाठी गेट उघडण्यात आले, येथील प्रभारी उपअधिक्षक भुमी अभिलेख यांच्या कडे झरी तालुक्याचा सुध्दा प्रभार असल्याने मारेगाव येथे कार्यालयात केवळ दोनच कर्मचारी उपस्थित होते.
वणी बहुगुणी चा दणका
अजब कामाच्या जगब प्रकारासाठी बहुचर्चित असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभारा विरोधात गेल्या सहा महिन्यांपूर्वी वणी बहुगुणी ने सतत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. वरिष्ठांनी त्या बातम्यांची दखल घेत नोटिसा बजावून येथील सहा कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले होते.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा