रफीक कनोजे झरी: पाटण ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची निविदा न काढता परस्पर १५० एलईडी बल्ब केले. ह्या मध्ये दोन ते अडीच लाखांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बोनगिरवार यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी गटविकास अधिकारी व वरीष्ठ अधिकार्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतद्वारे शासनाच्या माध्यमातून वित्त आयोग योजनेतून अनेक योजना राबविण्यात येतात. याच योजनेतून पाटण ग्रामपंचायतद्वारे कोणत्याही प्रकारचा ग्रामसभेत ठराव घेवून प्रस्ताव प्रारित न करता, किंवा निविदा न काढता परस्पर १५० एलईडी बल्ब बाराशे ते पंधराशे रुपयात खरेदी करण्यात आले आहे. ३२०० रुपये प्रति नग प्रमाणे १५० बल्बची रक्कम चार लाख अंशी हजाराची रक्कम बोगस बिलात दर्शविन्यात आली.
ह्या व्यवहारात दोन ते अडीच लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून संबधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बोनगिरवार यांनी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष ह्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.