जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले. यात वणी शहरातील 2 तर ग्रामीण भागातील 9 रुग्ण आहेत. शहरात जैताई नगर व रंगनाथ नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात चिखलगाव येथे 3, पुनवट येथे 2 तर येनक व कोलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. याशिवाय माजरी व मुकुटबन येथील प्रत्येकी 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. याशिवाय आज 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 41 झाली आहे.
आज शनिवारी दिनांक 5 जून रोजी यवतमाळहून 97 अहवाल प्राप्त झालेत. यात 10 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. याशिवाय आज 68 संशयीतांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. आज आलेल्या रुग्णांवरून 40 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 72 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 41 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 4 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 27 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 10 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5247 रुग्ण आढळून आलेत. यातील 5113 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: