जब्बार चीनी, वणी: कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीने कात्री लागत आहे. पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे तर डिझेलची किंमतही 90 रुपयांच्या वर गेली आहे. ही दरवाढ अशीच चालू राहिली तर डिझेल देखील शंभर रुपये होण्यास वेळ लागणार नाही. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. याच इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करत आहे. वणीत देखील हे आंदोलन धडाक्यात करण्यात आले.
वणीतील लाठीवाला पेट्रोल पंप समोर काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कऱण्यात आली. निषेद आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या 7 वर्षांपासून पेट्रोल डिझेल व गॅस ची दरवाढ हे केंद्र सरकार सातत्याने करत असून याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. जवळ जवळ 25 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने या वाढीमधून गोळा केले आहेत याचा परिणाम महागाई वाढी मध्ये झाला आहे. विशेषतः आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेलाचे भाव कमी असतानासुद्धा सातत्याने ही भाववाढ नागरिकांना लादली जात असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे कऱण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी य.जि.म. सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, डॉ.मोरेश्वर पावडे, इजहार शेख, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद निकुरे शहराध्यक्ष काँग्रेस, ओम ठाकूर, प्रमोद लोणारे, सुनिल वरारकर, हफीज रहेमान, रफीकभाई रंगरेज, अशोक नागभिडकर, संध्याताई बोबडे, प्रदिप खेकारे, अभिजीत सोनटक्के, विकेश पानघाटे, स्वप्नील सानेकर इ . काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा: