सुशील ओझा, झरी: कोविड 19 च्या आजारापासून सुरक्षीत राहण्यासाठी व आजारापासून बचाव करण्यासाठी सर्व जनतेनी लस घेणे आवश्यक आहे. याकरिता ग्रामपंचायत कार्यालय अडेगाव व आरसीसीपीएल कंपनीच्याच्या संयुक्त विद्यमाने अडेगाव येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
सध्या कोविडबाबत विविध संभ्रम निर्माण झाले आहेत. सदर बाब लक्षात घेऊन जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी सरपंच सीमाताई लालसरे, तलाठी बरशेट्टीवार, पोलीस पाटील अशोक उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य वंदना पेटकर, संजय आत्राम, संतोष पारखी, आरसीसीपीएलच्या सीएसआर प्रमुख वनश्री वनकर, सपना काटकर, संध्या टेकाम, कोवे, आशा सेविका ममता माहुरे, बचत गटाच्या मनीषा वासाडे, मंथना लोडे, अंगणवाडी सेविका संतोषी बलकी, बेबी आंबेडकर, मदतनीस मंजुषा धानोरकर, वर्षा उईके, पशुसखी संगीता झाडे
यांच्यासह गावातील गणेश पेटकर, कु.दीक्षा पिंगे, भावना घोगले, साक्षी पारखी, गिरीधर राऊत, रमेश गावंडे, मारोतो गोंडे ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता पाल, गणेश झाडे, पंकज उईके, गजू गुमुलवार आदी ग्रामस्थ जनजागृती करण्यासाठी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न