रक्तदान क्षेत्रातील कार्यासाठी प्रफुल्ल भोयर यांचा सत्कार
बोटोणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
सुशील ओझा, झरी: 1 जुलै रोजी कृषीदिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सामाजिक कार्यात विशेष योगदान देणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तहसीलदार पुंडे, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, चोपणे विद्यालयाचे मुख्याध्यापक व मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान केलं. यावेळी रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या प्रफुल्ल भोयर यांचा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते शाल, शिल्ड आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील अनेक गरजूंना प्रफुल्ल भोयर यांनी रक्ताची गरज लक्षात घेऊन मदत केली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती प्रतिष्ठानचे राजेश पांडे व समस्त गावकरी यांनी सहकार्य केले.