पैसे चोरीचा आळ लावल्याने दिराची वहिणी व पुतणीला मारहाण

खरबडा परिसरातील घटना, दिर व भावजयीविरोधात गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: चोरीचा आळ लावल्याने दिरानेच वहिणीला व पुतणीला मारहाण केल्याची घटना वणीतील खरबडा येथे घडली. गुरुवारी दुपारी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यात पुतणी जखमी झाली आहे. या प्रकरणी दिर व भावजयीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

शहरातील खडबडा परिसरात कविता कामेश्वर राठोड (35) राहते. तिच्या शेजारीच आरोपी अजय शेलार (21) व सोनी अजय शेलार (23) हे पतीपत्नी राहतात. कविताचे ते नात्यातच येतात. अजय हा दिर तर सोनी ही तिची भावजयी होते. नातेवाईक होत असल्याने तसेच शेजारीच राहत असल्याने त्यांचे एकमेकांकडे येणे जाणे सुरु असायचे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गुरुवारी दिनांक 8 जुलै रोजी कविता राठोड हिला तिच्या घरच्या कपाटातून काही रक्कम चोरीला गेल्याचे कळले. 4 वाजताच्या सुमारास तिने अजय शेलार व सोनी अजय शेलार यांच्या घरी जाऊन त्यांना याबाबत विचारणा केली. चोरीचा आळ लावल्याने अजय व सोनी हे तिच्यावर चिडले व त्यांनी कविताला धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यामुळे कविता ही याबाबत रिपोर्ट देण्याकरीता वणी पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाली. 

तक्रार देण्यासाठी कविता पोलीस स्टेशनला गेली असल्याचे कळताच शेलार पती पत्नी चिडले व ते कविताच्या घरी गेले. तेव्हा घरी तिची मुलगी जयश्री (15) होती. शेलार पती-पत्नीने जयश्रीला तुझी आई पोलीस तक्रार का करत आहे असा जाब विचारत त्यांची पुतणी जयश्रीला काठीने मारहाण केली. दरम्यान जयश्रीने मारहाण झाल्याचे आईला मोबाईलवर कॉल करून कळवले. मुलीला मारहाण झाल्याचे कविता पोलीस स्टेशनहून थेट घरी गेली. तेव्हा तिला जयश्रीच्या हातावर काठीने मारहाण झाल्याचे लक्षात आले.

झालेल्या प्रकारामुळे कविताने पुन्हा पोलीस स्टेशन गाठले व अजय व सोनी शेलार यांच्याविरोधात तक्रार दिली. मुलगी जयश्रीचे मेडिकल केले असता तिच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांनी आरोपी अजय शेलार व सोनी अजय शेलार यांच्या विरोधात भादंविच्या कलम 324, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोउ डोमाजी भादीकर करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.