वीजचोरी करणे पडले महागात, ठोठावला 27 हजारांचा दंड

सिंधीवाढोणा येथे वीज पुरवठा कट केल्यानंतर अवैधरित्या केली परस्पर जोडणी

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सिंधीवाढोना या गावात येथे वीज कट झाल्यानंतर परस्पर विजेची परस्पर जोडणी करून वीज चोरी करणे एका ग्राहकास चांगलचे महागात पडले आहे. शनिवारी वीज वितरण कंपनीद्वाराच्या त्याच्या घराची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 26 हजार 880 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तालुक्यातील सिंधीवाढोना येथे संजय गणपत सोनूले (40) राहतात. त्यांच्यावर 38 हजार 791 रुपये वीज बिल थकीत होते. संजय यांनी वीज भरणा केला नाही म्हणून 3 ऑगस्ट 2019 रोजी त्यांच्या घराचा वीज पुरवठा कट करण्यात आला होता. त्यानंतर संजय यांनी परस्पर वीज जोडणी करून घेतली व ते वीज वापरत होते.

वीजबिल भरण्याबाबत वीज वितरण कंपनीतर्फे त्यांना नोटीस देण्यात आली. मात्र त्यांनी वीज बिलाचा भरणा करण्यास नकार दिली. शनिवार 10 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास हेमंत लटारे सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग मुकुटबन यांनी संजय यांच्या घराची तपासणी केली असता त्यांना संजय यांना संजय यांनी पोलवरून येणाऱ्या सर्व्हिस वायरवरून वीज जोडणी करून अवैधरित्या वीज जोडणी केल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या पानठेल्यावरही अवैधरित्या वीज जोडणी आढळून आली.

लटारे यांनी संजय यांच्या घरातील मीटर जप्त करून त्यांच्यावर 26 हजार 880 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच संजयवर गुन्हा दाखल करावा अशी सूचना दिली. त्यावरून वणी पोलीस स्टेशनमध्ये संजयवर घरातील वीजचोरीसाठी भादंविच्या कलम 138 नुसार तर पानठेल्यावर अवैधरित्या वीज जोडणी केल्याने भादंविच्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात अनंता इरपाते करीत आहे.

हे देखील वाचा:

वणीत साई हॉस्पिटलमध्ये 24×7 अतिदक्षता विभाग सुरू

गोंडबुरांडा येथे कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.