योगेश पोद्दार यांची जागतिक संमेलनासाठी निवड
लॉस एन्जिल्समध्ये होणाऱ्या संमेलनात होणार सहभागी
निकेश जिलठे, वणी: वणीतील एलआयसी एजंट योगेश पोद्दार यांची विमा व्यवसायातील जागतिक पातळीवरील सन्मान एमडीआरटीसाठी निवड झाली आहे. वणीमधले यावर्षी सन्मानासाठी पात्र ठरलेले पहिले एजंट आहे. वणी आणि परिसरातील सुमारे 500 एजंटमधून केवळ त्यांनीच हा मान मिळवला आहे. जगातील सर्व विमा कंपनीच्या एजंट्सना या सन्मानासाठी पात्र होण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला जातो. मात्र त्यांनी हे टारगेट दोन महिन्या आधीच पूर्ण करून एक रेकॉर्ड स्थापित केला आहे.
काय आहे एमडीआरटी सन्मान ?
जगभरातील विमा एजंटना एक टारगेट असते. जो एजंट अपेक्षीत टारगेट पूर्ण करतो, त्या एजंट्सना जागतिक पातळीवर होणाऱ्या विमा व्यवसायातील सर्वोच्च शिखर संमेलनात सहभागी होण्याचा मान मिळतो. या परिषदेत जगभरातील विमा कंपन्यांचे एजंट्स सहभागी होतात. तिथे विमा आणि त्यात होणारे परिवर्तन, तसेच जगातील विमा व्यवसायात लिजेंड ठरणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळते. यंदा हे शिखर संमेलन अमेरिकेतील लॉस एन्जिल्स येथे जुलै महिन्यात होणार आहे. एलआयसी ही जगातील इतर विमा कंपनीपेक्षा सर्वात जास्त एमडीआरटी एजंट्स तयार करणारी कंपनी आहे.
सध्या बाजारपेठेत मंदी आहे. मात्र या मंदीच्या काळातही योगेश पोद्दार यांनी एमडीआरटी सन्मान मिळवून वणी शाखेसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या सन्मानाने वणी शाखेतील विमा व्यवसायाला एक नवसंजिवनी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना या कार्यासाठी डेव्हलपमेंट ऑफिसर (DO) हेमंतकुमार टिपले, शाखा प्रबंधक रविंद्र कमाने, शाखा प्रबंधक (सेल्स) राऊत यांचे मार्गदर्शन मिळाले.