वीज पडून नुकसान झालेल्या पशुपालकांना दुधारु शेळ्या देण्याची मागणी
खातेरा येथे वीज कोसळून 27 शेळ्यांचा मृत्यू झाला होता
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खातेरा गावानजीक 7 जुलै रोज अचानक वादळी वाऱ्यासह जोरात पावसाळा सुरवात झाली. विजेच्या कडकडाट सुरू झाला. दरम्यान जंगलात चरण्याकरिता गेलेल्या 27 बकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यात पशुपालकांचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच विशाल ठाकरे व उपसरपंच योगेश मडावी यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी व गरिबांना शासनाने दुधारू शेळ्यांचा पुरवठा करून शेतकऱ्यांना मदत करावी. कारण शासनाकडून नैसर्गिक आपत्ती नुकसान म्हणून अल्पशा मदत मिळणार आहे. परंतु दुधारु शेळ्या दिल्यास त्यांना उपजीविकेचे साधन मिळेल. असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
खातेरा येथील सुधाकर पांडे 5, विकास आगरकर 2, रवी जुनघरी 3, गेडाम 4, नारायण भोयर 1, शंकर गायकवाड 2, दशरथ बुटे 2, अंबादास वासेकर 1, दत्ता जुनघरी 1, दिवाकर भोयर 1, धर्मराज वाघाडे 1, बळीराम गोडे 2, अमोल सोटक्के 1 यांचे मालकीच्या बकऱ्यांचा मृत्यू झाला. एक बकरीची किंमत 15 हजार रुपये प्रमाणे शेतकरी यांचे 3 ते साडेतीन लाखाचे नुकसान झाले.
वीज पडल्याची माहिती मिळताच खातेरा सरपंच विशाल ठाकरे पोलीस पाटील राहुल गोडे, सचिन टाले सह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस व पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले होते.