वणीत वरठी (परीट) धोबी समाजाचा समाज मेळावा संपन्न

नवनिर्वाचित पदाधिका-यांना देण्यात आले नियुक्तीपत्र

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 17 जुलै रोजी वणीतील संत गाडगेबाबा समाज भवन वरठी (परीट) धोबी समाजातर्फे समाज मेळाव्याचे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात वणी, झरी-जामनी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्य वरठी (परीट) धोबी समाज महासंघाचे अध्यक्ष डी डी सोनटक्के यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

दुपारी 12 वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली. समाज भवन‌ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भैय्याजी रोहणकर, रूकेश मोतीकर, राजेंद्र मुके, चंद्रशेखर केळतकर, प्रकाश क्षिरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वणी, झरी-जामनी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यातील कार्यकर्त्यांची पदनियुक्ती करण्यात आली. डी.डी. सोनटक्के यांच्यातर्फे नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डीडी सोनटक्के म्हणाले की आपण ज्या समाजामध्ये आपण जन्मलो त्या समाजाचे सामाजिक ऋण फेडणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी संत गाडगेबाबांचा संदेश अंमलात आणणे गरजेचे आहे. समाजाचा उत्कर्श व्हावा या करीता सर्व समाज बांधवांनी संघटीत होऊन द्वेश, अहंकाराला तिलांजली द्यावी. जो कोणी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन डीडी सोनटक्के यांनी नवनिर्वाचित पदाधिका-यांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू तुरणकर यांनी केले तर सूत्रसंचालन ज्योती फाले यांनी केले. उपस्थितांचे आभार शुभम धानोरकर यांनी मानले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संघटनेचे विदर्भ महासचिव राजू तुरानकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तर दीपलाल चौधरी, प्रदीप मुके, कैलास बोबडे, ज्ञानेश्वर भोंगळे, नितीन बिहारी, जनार्दन थेटे, सतीश दोडके, भास्कर पत्रकार, राजेश क्षीरसागर, कलावती क्षीरसागर, गीता तुरानकर, मीना तुरानकर, प्रतिभा फाले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

निसर्गरम्य देऊळवाडा येथील संगमेश्वर देवस्थान दुर्लक्षित

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.