गुरुकुल कॉन्व्हेंटच्या 14 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण
मुकुटबन येथील रुपाली उदकवार 99 टक्के गुणांसह झरी तालुक्यातून प्रथम
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. यात मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट या शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100 टक्के लागला. तर शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले आहे. कु. रुपाली उदकवार हिने 99 टक्के गुण प्राप्त करत शाळेत तसेच तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
कु. प्रितिका रोगे हिने 96.80 मिळवून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. आयुष ठाकरे 95.20 %, श्रावणी पाईलवार ९४.४०%, आशिष पायताडे ९३.४०%, समीक्षा व-हाटे ९३.२०, हर्ष वैद्य ९२.६०%, ऍना पुनवटकर ९२.६०%, पांचाली दास ९१.८०%, तनुश्री आलगोटवार ९१.६०%, तनवी देवधगले व प्रथमेश वरहाटे यांनी अनुक्रमे ९१.४०% टक्के गुण तर अभय चेलपेलवार आणि आशुतोष कोडापे यांनी अनुक्रमे ९०.२०% गुण मिळवले आहेत.
सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आराखड्याद्वारे हा निकाल दिलेला आहे. यात इयत्ता ९ वी चे ५०% गुण, दहावीच्या लेखी परीक्षेचे ३० गुण, आणि दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण मिळवून निकाल जाहीर करण्यात आला आहे.
विदयार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबदद्ल शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुभाष गजभिये सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.
रुपालीला बनायचे आहे जिल्हाधिकारी
तालुक्यातून प्रथम आलेली रुपाली उदकवार हिला जिल्हाधिकारी बनायचे आहे. यासाठी तिने आतापासून तयारीला सुरूवात केली आहे. कोरोनामुळे ऑनलाईन क्लास सुरू होता. तिने एकही क्लास चुकवला नाही. जिल्हाधिकारी बनून सेवा करायची आहे अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. यासाठी तिने आतापासूनच यूपीएसस्सीच्या तयारीला सुरूवात केली आहे. ती आपल्या युद्धाचे श्रेय वडील दिलीप उदकवार, आई, मुख्याध्यापक सुभाष गजभिये व शिक्षकांना देते.