राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने युवकांचा प्रवेश

विश्रामगृहात विजया आगबत्तलवार व सूर्यकांत खाडे यांचा वाढदिवस साजरा

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 20 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष विजया आगबत्तलवार व तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे यांचा वाढदिवस स्थानिक विश्रामगृहात साधेपणाने साजरा करण्यात आला. दरम्यान जयसिंग गोहोकार यांनी सरकारी जाचक यंत्रणेमुळे अनेक शेतकरी पिक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याचे सांगत याबाबत मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

Podar School 2025

राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आगबत्तलवार व खाडे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. दरम्यान डॉ महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यामध्ये दिनेश पाउनकर, शुभम लेनगुरे, यश क्षीरसागर, किशोर नित, रोहीत बरांडे, करण क्षीरसागर, रोहीत जवळे, गोलू झाडे, अमोल महाकुलकार, सौरभ वानखेडे इत्यादींचा समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंग गोहोकर, शहर अध्यक्ष राजाभाऊ बिलोरीया, माजी नगराध्यक्ष आशा टोंगे, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले, उपाध्यक्ष वैशाली तायडे, मारोती मोहाडे, रामकृष्ण वैद्य, प्रेम कुमार, मुस्कान पोन्नलवार, भावना कोमलवार इ यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.