गोवंश तस्करीचे जनावर अजूनही पोलिसांच्या ताब्यात

पाटण ठाण्यातील ठाणेदारांची कार्यप्रणाली संशयाच्या भोव-यात

0

रफिक कनोजे, मुकूटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत तेलंगाणाला जोडना-या दिग्रस अनंतपुर पुलाजवळ वन विभागाच्या चेकपोस्टवर २९ ऑक्टोबर रविवारी रात्री एक वाजता २ ट्रकमध्ये निर्दयतेने ६३ गाय व बैल कोंबून नेताना पकडण्यात आले होते. नागपूर येथील एका ट्रक चालकावर या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती तर एक ट्रक चालक फरार झाला होता. ही जप्त करण्यात आलेल्या जनावरांपैकी २० जनावरे पाटण येथील कोंडवाड्यात टाकून बाकीची जनावरे तालुक्यातील दुसऱ्या गावाच्या कोंडवाड्यात किंवा गोशाळेत न टाकता पोलीस ठाण्याच्या आवारातच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेदारांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचा एका दिवसाचा पीसीआर घेण्यात आला आहे. त्यात त्याने पुन्हा दोघाचे नाव सांगितले, मात्र ठाणेदारांनी अद्याप इतरांना अटक केलेली नाही. तसंच एक ट्रक चालक फरार झाला होता. कार्यवाहीनंतर रात्री पुन्हा जनावरांची तस्करी करण्यात आल्याची माहिती स्थानिक देत आहे. तर मग इतरांवर कार्यवाही का करण्यात आलेली नाही असा प्रश्न आात उपस्थित होत आहे.

रविवारच्या रात्री २ ट्रक जप्त करण्यात आले. रात्रीच्या वेळेला आपल्या मर्जीतील महिला व कर्मचाऱ्यांना चेक पोस्ट्वर ड्युटी लावण्यात येत आहे. पोलीस ठाण्यातील सीडीआर रेकार्ड जर तपासून पहिला तर ह्या प्रकरणातील महिलांच्या ड्युटीचे खरे वास्तव उघडकीस येईल. या मार्गावरून तस्करी होत असताना त्या जागी महिला कर्मचा-यांची ड्युटी का लावण्यात येत आहे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. त्यामुळे ठाणेदारांच्या एकूणच कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.