निकेश जिलठे, वणी: वणी तालूक्यातील राजूर येथे मास्टर चेस अकादमी तर्फे खुली बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून वसुंधरा गजभिये, जि.प.सदस्य संघदीप भगत, सरपंच प्रणिता असलम, अशोक वानखेडे होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक आदित्य काकपूरे, द्वितीय पुरस्कार सुरज जयस्वाल, तृतीय कुमार कनकम, चतुर्थ निलेश बांदे तर पाचवा पुरस्कार अब्दुल हमीद सत्तार यांनी पटकावला. नयन रामटेके, आदित्य बोदलवार, अथर्व केळकर, सक्षम चेडे,अपुर्वा परसोडकर, आयुष ठाकरे यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले.
या स्पर्धचे संचालन महेश लिपटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मारोती कोंडागुर्ले यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अकादमीचे अध्यक्ष महादेव सोनटक्के, सरोज मून, गौतम खैरे, अँड.अरविंद सिडाम, नंदकिशोर लोहकरे,अंकुश पेटकर, अजय कोंडागुर्ले आदींनी सहकार्य केले.