सावधान…! वणीतील एका हॉटेल व्यावसायिकास ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न

● सैनिकांसाठी खाद्यपदार्थाची ऑर्डर, ओटीपी मागूण फसवणूक

0

जितेंद्र कोठारी, वणी: सेनेच्या जवानांसाठी फोनवर खाद्य पदार्थचे ऑर्डर देऊन येथील एका हॉटेल व्यावसायिकाला ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रयत्न एक भामट्याने केला. परंतु हॉटेल व्यावसायिकाला शंका आल्यामुळे त्याचा बँक खाता रिकामा होण्यापासून थोडक्यात वाचला. मात्र ऑर्डरनुसार काही प्रमाणात तयार केलेला माल वाह्या गेल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाला दोन हजाराची चापट बसली.

चार पाच दिवसापूर्वी सकाळी 7 वा. दरम्यान सदर हॉटेल व्यवसायिकाच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी आपण सुरक्षाबलात कमांडर असून आपले नाव जोरासिंग सांगितले. तसेच त्यांची बटालियन वणी मार्गे गडचिरोलीला जात असुन वणी पोलीस ठाण्यात काही वेळ थांबणार असल्याचे सांगितले. बटालियन मधील सैनिकांसाठी वणीमध्ये नाश्त्यासाठी त्या भामट्याने ऑर्डर घेण्याची विनंती केली. ऑर्डर देणाऱ्याची रुवाबदार आवाज ऐकून हॉटेल मालकाने त्यांनी सांगितले प्रमाणे दोसा, सांबार वडा, समोसा, कचोरी, पराठे, सांबरवडी व इतर खाद्यपदार्थचे ऑर्डर लिहून घेतली.

ऑर्डर दिलेल्या मालाची किंमत तब्बल 7 हजार रुपये होती. त्यामुळे हॉटेल मालकाने आलेल्या नंबरवर फोन करून काही ऍडव्हान्स रक्कम देण्याचा आग्रह केला. मात्र त्या भामट्याने आम्ही देशाचे सैनिक आहो, आमच्यावर तुमचा विश्वास नाही का ? असा उलट प्रश्न केला. तसेच आम्ही वणी पोहोचल्यानंतर आमचा जवान किंवा वणी पोलिस ठाण्यातील कर्मचारी पैसे देऊन सामान घेऊन जाईल असे सांगितले. विशेष म्हणजे हॉटेल व्यावसायिक आणि तथाकथित कमांडरमध्ये हा सर्व संभाषण हिंदी भाषेत झाला होता.

एकीकडे सकाळी सकाळी मोठा ऑर्डर तर दुसरीकडे ऑर्डर देणारा माणूस अनोळखी. या विवंचनेत हॉटेल व्यावसायिकाने ऑर्डरप्रमाणे माल तयार करणे सुरु केले. मात्र त्याच्याही मनात कुठतरी शंकेची पाळ चुकली. आणि त्यांनी आलेल्या नंबरवर परत कॉल करून तुमच्या ऑर्डरप्रमाणे नाश्त्याचे समान तयार झाला असून माणूस पाठवून द्या, अशी सूचना केली. आणि इथून सुरु झाला ऑनलाइन फ्राडचा अस्सल खेळ.

समोरील व्यक्तीनी येण्यास थोडं विलंब होणार असून गुगल पे वरून पेमेंट करतो असे सांगितले. तर थोड्याच वेळात त्या व्यक्तीने पुन्हा फोन करून गुगल पे काम करत नसून कार्ड टू कार्ड पेमेंट करणार असून तुम्ही आपल्या डेबिट कार्डचे दोन्ही साईडचा फोटो पाठविण्याची विनंती केली. आपल्या सोबत नक्कीच फ्राड होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल मालकाने आपल्या खात्यातील सर्व रक्कम दुसरीकडे वळती करून खात्यात फक्त शंभर रुपये शिल्लक ठेवले. त्यानानंतर त्यांनी डेबिट कार्डची फोटो त्या भामट्याच्या व्हाट्सएपवर पाठविली.

थोड्याच वेळात त्या ठकबाजने हॉटेल मालकाच्या मोबाईल वर आलेला ओटीपी मागितला. मात्र हॉटेल व्यावसायिकांनी ओटीपीच्या जागी त्या भामट्याची चांगलीच क्लास घेतली. येथेच्छ शिवीगाळनंतर हा सर्व प्रकरणावर पडदा पडला. मात्र तो पर्यंत हॉटेल व्यावसायिकांनी एक दीड हजाराचे माल तयार केले होते. तयार केलेला माल खराब झाल्यामुळे तेवढा नुकसान हॉटेल मालकाला सहन करावा लागला. तसेच याबाबत कुठेही तक्रारसुद्दा करण्यात आली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.