स्माईल फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व सभासद फॉर्मचे अनावरण

● ध्वजारोहणानंतर वृक्षारोपण उपक्रम

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील स्माईल फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने स्थानिक एस.पी.एम शाळेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सभासद फॉर्म चे अनावरणही मान्यवरांच्या करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी व सहसचिव सोनटक्के सर व मंडळाचे इतर सदस्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात लो. टि. महाविद्यालयाचे प्राचार्य व शाळेचे मुख्याधापक, शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

स्माईल फाउंडेशन ही एक अधिकृत व नोंदणीकृत असलेली सामाजिक संस्था असून पर्यावरण आरोग्य आणि शिक्षण इत्यादी क्षेत्रात काम करीत आहेत. 14 ऑगस्ट 2021 रोजी संस्थेच्या स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झाले. या काळात संस्थेच्या वतीने 350 पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण व संगोपन ,पक्ष्यांसाठी दाण्या पाण्याची सोय, रक्तदान शिबिराचे आयोजन , प्लाजमा दान करण्यासाठी जागृती ,

दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे यासाठी प्रयत्न तसेच 400 अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरणासाठी सहकार्य व लसीकरांसाठी जागृती ,कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांचे समुपदेशन, बेड, अंबुलन्स, ,प्लाज्मा किंवा औषधी मिळवून देण्याचा प्रयत्न व रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची लुट थांबावी या साठी प्रयत्न करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्माईल फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.