जलसंधारण विभागाच्या प्रमुखावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

शिबला येथील शेतक-याचे आत्महत्या प्रकरण, कुटुंबीयांची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील एका युवा शेतक-याने दिनांक 3 ऑगस्ट रोजी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी जलसंधारण विभाग प्रमुखावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार मृतकाच्या मोठ्या भावाने पोलीस स्टेशन पाटण येथे केली आहे.

पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिबला येथील मंगल पुसाम व लखू पुसाम आणि एक असे तीन भाऊ असुन यांची शिबला शिवारात तीन हेक्टर संयुक्त शेती आहे. या शेतातून चिलई तलाव प्रकल्पाचा नागमोडी कालवा गेला आहे. परंतू हा नागमोडी कालवा सतत पाझरत असतो. सततच्या पाझरण्याने शेतक-यांचे नुकसान सुरू होते. तसेच पावसाळाच्या दिवसात हा कालवा ओव्हरफ्लो वाहत असल्याने शेताला नाल्याचे स्वरूप आले.

त्यामुळे शेत पीक घेण्यास अयोग्य होत गेले. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शेतातील कालव्याचे सरळीकरण व अस्थिकरण करुन द्यावे अशी मागणी सण 2008 पासून तर 2018 पर्यंत जलसंधारण विभागाकडे लेखी स्वरुपात करित गेले, परंतू या मागणीकडे या विभागाने पूर्णता दुर्लक्ष केले व कोणतिच दखल घेतली नाही, त्यामुळे या बंधुनी सण 2018 मध्ये पुन्हा एक निवेदन जलसंधारण विभागाला लिहले व दुरस्तीची मागणी केली. तसेच कालवा दुरस्ती न केल्यास आमच्या कडे आत्महत्ये शीवाय पर्याय नाही असे निवेदनातुन जलसंधारण विभागाला कळविले.

तरीपण तक्रारीला केराची टोपली दाखविन्यात आले. त्यामुळे या शेतकरी बंधुनी ही तक्रार आपले सरकार या पोर्टलवर नोंदविली. आपली सरकार पोर्टल तर्फे तक्रार प्राप्त झाल्याचे शेतकऱ्यांना कळविण्यात आले. परंतू पुढील कारवाई शून्य राहली या बाबिला बराच उशिर होवुन गेला 10 ते 15 वर्ष या कारनाने सततची नापिकी होत गेल्याने पुसाम कुटुंब डबघाईस आले .कर्जबाजारी झाले त्यामुळे या नैराश्य आले. कर्जबाजारी झाले त्यामुळे या नैराश्यातून पुसाम कुटुंबातील लखु पुसाम याने 3 ऑगस्ट रोजी सकाळी शेतात जावुन विषारी औषधि प्राशन करुन आत्महत्या केली .

ही आत्महत्या नसुन माझ्या भावाचा जलसंधारण विभागाने खुण केला आहे, माझ्या भावाच्या मृत्युला जलसंधारण विभागाचे खाल पासुन तर वर पर्यंतचे अधिकारी जबाबदार आहे. असा आरोप लखु यांच्या भावासह कुटुंबीयांनी केला. माझ्या भावाच्या मृत्यु प्रकरनी जलसंधारण विभागाच्या अधिका-यांनवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार मृतकाचा मोठा भाऊ मंगल पुसाम यानी पाटण पोलिस स्टेशनला केली आहे. व जलसंधारण विभागाच्या अधिकारी यांच्यावर कार्यवाहीची तक्रार मंगल पुसाम यांच्यासह कुटुंबीयांनी केली आहे. तक्रार देतेवेळी मृतकाचे सर्व कुटुंब पोलिस स्टेशनला हजर होते.

हे देखील वाचा:

 

Comments are closed.