जितेंद्र कोठारी, वणी: न्यायालयात प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. वणी येथील न्यायालय परिसरात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण 694 प्रकरण निकाली काढून तब्बल 1 कोटी 2 लाख 36 हजार 593 रुपयांची वसुली करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जास्तीत जास्त प्रकरण निकाली काढता यावे या करिता 2 पॅनल गठीत करण्यात आले. एका पॅनलमध्ये पॅनल प्रमुख म्हणुन दिवाणी न्यायाधीश के. के. चाफले व सदस्य म्हणुन अॅड. सिडाम व अॅड. कुलकर्णी यांचा समावेश होता.
तर दुस-या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख म्हणुन सह- दिवाणी न्यायाधीश एस. एम. बोमीडवार व सदस्य म्हणुन अॅड. मांडवकर व अॅड. बोरुले होते. सोबतच विशेष न्यायालय म्हणुन सह-दिवाणी न्यायाधीश पी.सी. बछले यांनी कामकाज बघितले.
सदरहु लोकन्यायालयात एकुण 166 दिवाणी व फौजदारी दाखल प्रकरणे आपसी सामंजस्याने निकाली काढून 54,94,525 /- रु.एवढया रकमेची तडजोड झाली. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये बँका, ग्रामपंचायत, महावितरण व इतर असे एकुण 495 दाखल पूर्व प्रकरणे निकाली लागून 4719068/- रुपयांची वसुली झाली. मोटर व्हीकॅल ऍक्ट 66/192 व भादवी 269 अनव्ये एकूण 189 प्रकरण निकाली लागून 1 लाख 90 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
विशेष न्यायालयामध्ये एकुण 33 दाखल प्रकरणे निकाली लागून 33000 /- रु.दंड वसुल झाला. राष्ट्रीय लोक अदालतच्या संदर्भाने वणी येथील न्यायालयात दिनांक 22 ते 24 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहिम अंतर्गत एकुण 378 दाखल फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालत व विशेष न्यायालय व विशेष मोहिम यशस्वी होण्यास सहा अधिक्षक जाधव, खोंडे व देशमुख यांचेसह तालुका विधी सेवा समितीचे वरीष्ठ लिपीक सौ. जुमनाके, कनिष्ठ लिपीक निमकर व शिपाई महेश इतर न्यायालयीन कर्मचा-यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदविला.
सोबतच वकील संघटनेचे अध्यक्ष कावडे व इतर वकीलांनी मोलाचे सहकार्य केले व लोकअदालत यशस्वी होण्यास सहभाग दिला. वणी पोलीस स्टेशन व वाहतूक उप शाखा अंतर्गत दाखल प्रकरण राष्ट्रीय लोक अदालत मध्ये निकाली काढण्याकरिता पोनि शाम सोनटक्के व वाहतूक शाखा प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात सुनील कुंटावार, राजू बागेश्वर व संदीप मंडाले यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.