बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

अतिवृष्टीचा सोयाबिन व कपाशीला मोठा फटका

सुरेश पाचभाई, बोटोणी: गेल्या आठवड्यात बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी पुन्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीपर्यंत परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शेतामध्ये तळे साचले. अतीवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबिनचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यात अतीवृष्टी झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बोटोणी परिसरात पावसाने रौद्र रुप धारण केले. हा पाऊस रात्री 12 वाजे पर्यंत सुरू होता. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरूच होती. अतीवृष्टीमुळे परिसरातील बोटोणी, सराटी, घोगुलदरा, जळका, खंडणी, मेंढणी, बुरांडा, खापरी, हटवांजरी, खडकी, घोडदरा, खेकडवाई इत्यादी गावांना फटका बसला.

अतीवृष्टीमुळे या गावातील शेतामध्ये पाणी साचले आहे. अतीवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबिनच्या शेंगांची काडी झाली आहे तर कपाशी लाल झाली आहे व बोन्ड सडून काळे पडले आहे. ऐन सोयाबिन काढण्याच्या वेळी अतीवृष्टी झाल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांनी प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

हे देखील वाचा:

कोसारा येथे जुगार अड्डयावर धाड, तिघांना अटक

अबब…! बोअरवेलला लागली कळं, पाणी ‘बदंबदं’ गळं

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.