जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कोलगाव घाट येथून दिवसाढवळ्या रेती चोरी करून वाहतूक करताना एक ट्रॅक्टर शिरपूर पोलिसांनी पकडले. शुक्रवार 12 ऑक्टो. रोजी दुपारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी रेती 2 ब्रास सह 5 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांना पैनगंगा नदीतून रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून शिरपूर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 1 वाजता दरम्यान शिंदोला ते कैलाशनगर रस्त्यावर एका विना नंबरच्या ट्रॅक्टरला थांबवुन चौकशी केली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे 2 ब्रास रेती भरून वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला रेतीची रॉयल्टी व वाहतूक परवाना संबंधित विचारणा केली असता चालकांना काहीही नसल्याचे सांगितले.
वाहतूक करीत असलेली रेती अवैधरित्या चोरट्या मार्गाने वाहतूक करीत असल्याचे आढळल्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टर व रेती भरलेली ट्रॉली जप्त केली. तसेच ट्रॅक्टर चालक विठ्ठल देवराव आत्राम (40), ट्रॅक्टर मालक धर्मा सिताराम मोहितकर (61) रेती भरणारे 2 मजूर अतुल सूर्यभान बोबडे (45) व भगवान यादव चिंचोळकर (45) सर्व रा. शिंदोला याना अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपी विरुद्ध कलम 379, 34, भा.दं.वि व सहकलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलीस उप अधीक्षक संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडूरे, प्रमोद जूनुनकर, सुगत दिवेकर, अक्कलवार, अनिल सुरपाम यांनी केली.
हे देखील वाचा:
Comments are closed.